लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. एका शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून, त्यांच्या ८ एकर शेतात चौबार पेरणीचे संकट त्यांच्यावर उभं ठाकले आहे त्यामुळे आता जगावे की मरावे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले. मात्र पावसामुळे ते निघालेच नाहीत. बुधवारच्या पावसाने त्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे त्यांना आता चौबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या त्यांच्या शेतात शासनाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांना भरपाई मिळाली नाही. यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतासुद्धा पाणी साचले आहे. बुधवारच्या पावसाने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
गायवाडीचे शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:00 AM
दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले.
ठळक मुद्देशेकडो एकर शेतात पाणी : चौथ्यांदा पेरणी, मदतीची मागणी