चित्रकला क्षेत्रात प्राविण्यप्राप्त दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:39 AM2020-12-17T04:39:57+5:302020-12-17T04:39:57+5:30
अमरावती : शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ठ झालेल्यांना सवलत गुण दिले जाते. मात्र, ...
अमरावती : शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ठ झालेल्यांना सवलत गुण दिले जाते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे एलेमेंटरी, इंटरमीजीएट ग्रेड परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे चित्रकला क्षेत्रात प्राविण्यप्राप्त दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने केली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सादर निवेदनातून चित्रकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडण्यात
आल्या. कला संचालनालयाने यंदा एलेमेंटरी, इंटरमीजीएट परीक्षा घेतल्या नाही. परिणामी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी कला गुणांपासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सन २०१९-२०२० च्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या भूगोल विषयाची परीक्षा न घेता इतर विषयाचे सरासरी गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले आहे. याच निकषाच्या आधारे सन २०२०-२०२१ या वर्षातील माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रकला क्षेत्रात प्राविण्यप्राप्त दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण द्या, अशी मागणी करण्यात आली. विनोद इंगोले, प्रल्हाद साळुंके, प्रल्हाद शिंदे, किरण सरोदे, राजेश निबेंकर, मिलिंद शेलार, हुसेन खान आदींनी मागणी केली आहे.