नियोजित वधूविरुद्ध वराची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:13+5:302021-06-30T04:09:13+5:30
पोलीस सूत्रांनुसार, महालक्ष्मीनगरातील ३२ वर्षीय युवकाचे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी ३ जानेवारी रोजी साक्षगंध झाले. ...
पोलीस सूत्रांनुसार, महालक्ष्मीनगरातील ३२ वर्षीय युवकाचे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी ३ जानेवारी रोजी साक्षगंध झाले. यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये नियोजित वधू व तिच्या प्रियकराने युवकाला गाठून ते लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर काही दिवसांनी वधू व तिच्या आईवडिलांनी नियोजित विवाह होणार असल्याचे विश्वास दिला. त्यामुळे सदर मुलीला १८ हजार रुपयांचा मोबाईल युवकाने घेऊन दिला. परंतु, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी विवाहास नकार देत चांदूर रेल्वे येथे युवकाला बोलावण्यात आले. या बैठकीत शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे फिर्यादी युवकाने न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी २७ जून रोजी भादंविचे कलम ४०६, ४१७, ४२०, ४९९, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. हा घटनाक्रम ३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान घडला.
-------------------