अतिखोल जलधारातून उपस्यामुळे भूजलात घट; ‘जीएसडीए’चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 08:46 PM2019-12-05T20:46:24+5:302019-12-05T20:46:43+5:30
राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे.
अमरावती : राज्यातील बहुतेक भागात ६० मीटरपेक्षा अधिक अतिखोल विंधन विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात आहे. काही भागांत १००० ते १२०० फुटांपर्यंत खोलीच्या विहिरी सिंचनासाठी कार्यरत आहेत. भूजल व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून २०० फुटांपेक्षा अधिक खोलपर्यंत होणारा पाण्याचा उपसा पुनर्भरीत होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. भूजलात कमी येण्याचे हे एक महत्वपुर्ण कारण असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) च्या अहवालात नोंदविले आहे.
राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे. यामध्ये पाणी साठवण क्षमता ही अत्यंत कमी म्हणजेच १ ते ३ टक्केच आहे. राज्याचा १० टक्के भूभाग हा कठीण अशा रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येदेखील पाणी साठवणीचे हेच प्रमाण आहे. उर्वरित ८ टक्के भाग हा खडकांनी व गाळाने व्यापला आहे. याच स्थरात ५ ते १० टक्कयांपर्यंत पाण्याची उपलब्धता आहे. भौगोलिक संरचनेचा विचार करता २८ टक्के भूभाग हा डोंगरमाथ्याचा व उताराचा आहे. याच प्रदेशात अधिक प्रमाणात जल अपधाव होत आहे. मात्र, भूजल उपलब्धता त्यामानाने कमी आहे. राज्यात एकूण ४४ टक्के भूभाग हा पठारी आहे. या भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. या व्यतिरिक्त २८ टक्के भूभाग हा नद्याखोºयांचा सपाट प्रदेश आहे. त्यामुळे भूजलाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत आहे.
भूजलात कमी येण्याची कारणे
सूक्ष्म सिंचनावरचे क्षेत्र अद्यापही मर्यादेत असल्यामुळे तसेच पारंपरिक पिकांसठी १०० टक्के सूक्ष्म सिंचन व्यवस्था अस्तित्वात न आल्यामुळे बºयाच भागात प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. बहुवार्षिक पिकांकरिता भूजलाचा अधिक उपसा होत आहे. पावसाचा खंड पडल्यास किंचा पर्जन्यमान कमी असल्यास शेतकरी खरीप पिकांसाठी अधिक भूजलाचा उपसा करून संरक्षित सिंचन करतात. त्यामुळे ज्यावेळी भूजलाचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे असते, नेमके त्याचवेळी भूजलाचा उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमी येत असल्याचे निरीक्षण जीएसडीए विभागाने नोंदविले आहे.