गुजरी बाजारातील अतिक्रमण जैसे थे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:21 AM2021-02-06T04:21:58+5:302021-02-06T04:21:58+5:30
सेकंड लिड पान २ नगरपंचायतच्या प्रशासकांचा लक्षवेध : धारणी : बहुचर्चित गुजरी बाजार अर्थात सर्व्हे नंबर १२६ विकासाच्या ...
सेकंड लिड पान २
नगरपंचायतच्या प्रशासकांचा लक्षवेध :
धारणी : बहुचर्चित गुजरी बाजार अर्थात सर्व्हे नंबर १२६ विकासाच्या दिशेने गतिमान होत असताना, नियमित दुकान लावणाऱ्यांनी आपापली जागा पूर्ववत सुरक्षित करून घेतली आहे. दहा बाजारओट्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर शेडनिर्मिती होण्याआधीच अनेकांनी त्यावर तंबू लावून व्यवसाय सुरू केले आहेत.
अतिक्रमणमुक्त गुजरी बाजाराला पुन्हा अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. ही जागा नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीला काही अटी व शर्तींवर हस्तांतरित केली. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. निर्धारित केलेला शासकीय दर चलानद्वारे भरणा करणे शिल्लक राहिले असून, पैशांचा भरणा झाल्यानंतर तहसीलदारांकडून सर्व्हे नंबर १२६ मधील ९६ आर जमीन महसूल विभाग अतिक्रमण तोडून नगरपंचायतीला हस्तांतरित केला जाणार आहे. तोपर्यंत तरी या जागेचे भवितव्य अंधारात असल्याचे चित्र आहे. सर्व्हे नंबर १२६ नगरपंचायतीला आर्थिक बूस्टर देणारी महत्त्वाची जागा आहे. या जागेवर व्यापारी संकुल आणि दुकानांचे ओटे लावल्यानंतर नगरपंचायतच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन विकासासाठी निधी संकलित होणार आहे.