अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्याही दिवशी गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:13 AM2021-03-21T04:13:57+5:302021-03-21T04:13:57+5:30
अमरावती: जिल्हयातील चांदूरबाजार, अचलपूर या दोन तालुक्यात सलग दुसºया दिवशी दुपारी गारपीट झाली. अचलपूर तालुक्यातील वझ्झर, धामणगाव गढी व ...
अमरावती: जिल्हयातील चांदूरबाजार, अचलपूर या दोन तालुक्यात सलग दुसºया दिवशी दुपारी गारपीट झाली. अचलपूर तालुक्यातील वझ्झर, धामणगाव गढी व अन्य परिसरात शनिवारी दुपारी गारपीटीसह वादळी पाऊस झाला. तर चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा, करजगाव, ब्राम्हणवाडा थडी या भागात बोराएवढी गार पडली. सोसाट्याच्या वाºयासह आलेल्या पावसाने संत्रा, गहू, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. चांदुररेल्वे, धारणी, तिवसा या तालुक्यात शनिवारी अकाली पाऊस कोसळला. मात्र गारपीटीचे वृत्त नाही. जिल्हाधिकाºयांनी पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. तर, मोर्शी तालुक्यातील तरोडा, धानोरा, भिवकुंडी, चिखलसावंगी, चिंचोली गवळी इत्यादी गावांमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकºयांचा संत्रा आंबिया व मृग बहार तसेच गहू, चना, भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले.