वरुड :- सफाई कामगाराच्या विविध मागण्याकरिता नागा रपरिषदेला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा दाखल घेतली नसल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद प्रांगणात अर्धदफन आंदोलन करण्यात आले . यामध्ये सफाई कामगार महिला अपुरषांनी सुद्धा अर्धदफन करून घेतले .
सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सफाई कामगाराना नियमित रोजगार देण्यात यावा तसेच मासिक वेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे .तसेच मिळत असलेल्या वेतनामधे दरवर्षी प्रमाणे वाढ करण्यात यावी .याकरिता नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले . यानंतर आमरण उपोषण सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले की सर्व कामगारांना नियमित कामावर घेऊ असे नमूद केले होते परंतु अद्यापही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने अखेर नागरी परिषद प्रागंणात सफाई कामगारासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी खड्ड्यामध्ये अर्धदफन आंदोलन केले .अखेर मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी ठेकेदाराला नोटीस देऊन सफाई कामगारांना कामावर घ्या अन्यथा ठेका रद्द करू असे पत्र दिले. आणि सफाई कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले. यावेळी राहुल बिनातकर, कुणाल बेसरे,आकाश बेसरे,राज रगडे,रोहन गुर्वे, अभिजित शिंगारे, अनिकेत नरहरे आंदोलनात सहभागी झाले होते तर सफाई कामगार महिला सुद्धा अर्ध दफन आंदोलन केले . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आणि सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते .