घर, बंगला, फ्लॅटधारकांनाही हवे घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 05:00 AM2021-08-11T05:00:00+5:302021-08-11T05:00:47+5:30
८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने डोक्यावर छत उभे राहणार आहे.
जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेत जिल्ह्याला १ लाख ७ हजार १७४ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याकरिता ९८ हजार ६५२ लाभार्थींनी नोंदणी केली आहे. यात ८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने डोक्यावर छत उभे राहणार आहे.
योजनेसाठी आर्थिक मागास घटकातील नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये घर, बंगला, फ्लॅट असलेल्यांचाही समावेश असून, पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे.
पात्र अर्जदारांची जॉब कार्ड मॅपिंग
घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९० ते ९५ दिवसाच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसाहाय्य दिले जाते. लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी ९५ हजार अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०११ च्या आर्थिक वा सामाजिक व जात सर्वेक्षण माहितीच्या आधारे यादी तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना डोक्यावर छत हा योजनेचा उद्देश आहे.
पंतप्रधान योजनेचा लाभ कुणाला?
वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ मिळू शकतो. वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखांपर्यंत असलेले कुटुंब व मध्यम उत्पन्नगटात ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी वर्गातील महिला अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गाचा या यादीत समावेश होतो.