शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

वादळी पावसासह प्रचंड गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 11:58 PM

रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले.

चांदूरबाजार तालुक्यात कहर : बाजार समितीत पाणीच पाणी, जिल्हाभरात पावसाची हजेरीचांदूरबाजार (अमरावती) : रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्याला झोडपले. चांदूरबाजार, परतवाडा, चिखलदरा, यावली, चांदूररेल्वे परिसरातही पावसाने आकस्मिक हजेरी लावली. मात्र, चांदूरबाजार तालुक्यात तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या प्रचंड गारपिटीमुळे पिकांसह बाजार समितीतील शेतमालाची देखील हानी झाली. तालुक्यात सगळीकडे गारांचा खच साचला होता. आठवडी बाजारात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर बाजार समितीतील कोट्यवधींचा मालही पावसाने भिजला. रविवारी दुपारपासून वातावरणात बदल झाला आणि क्षणार्धात सोसाट्याचे वारे, पाऊस आणि गारपीट सुरू झाली. रविवार हा चांदूरबाजारचा आठवडी बाजाराचा दिवस. हजारो नागरिक या बाजारात ग्रामीण भागातून खरेदीसाठी येतात. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची त्रेधा उडाली. आठवडी बाजारातील भाजीपाला व धान्य विक्रेत्यांची या पावसामुळे प्रचंड हानी झाली. बाजारात आलेल्या ग्राहकांना मिळेल त्या ठिकाणी अर्धा तास आसरा घ्यावा लागला. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील धान्य बाजाराचा दिवस असल्यामुळे तूर, हरभरा, गहू हा माल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. बाजार समतीमध्ये रविवारी तब्बल आठ हजार पोत्यांची आवक झाली होती. यापैकी सहा हजार पोते धान्य पावसात चिंब भिजले. बाजार समितीच्या आवारात एक फूटपर्यंत पाणी साचल्याने विक्रीसाठी खाली टाकलेले धान्य अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू चांदूरबाजार : त्यावर गारांचा थरही जमा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेदेखील कोट्यवधींचे नुकसान झाले. शहरासह तालुक्यातील दिलालपूर, जसापूर, माधान, हैदतपूर, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगावसह अनेक गावांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसला. इतर गावांची माहिती महसूल यंत्रणेमार्फत प्राप्त झाली नाही. गारपीट व वादळी पावसात कांदा, गहू, संत्रा, हरभरा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याकरिता महसूल यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करीत आहे. त्यांच्या अहवालानंतरच गारपीटग्रस्त गावांची संख्या व नुकसानीचा आकडा अधिकृतरीत्या प्राप्त होईल. ७० वर्षांत पहिल्यांदाच प्रचंड गारामागील ७० वर्षांत कधी नव्हे तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती परिसरातील वयोवृध्द नागरिक देत आहेत. ७० वर्षांपूर्वी छावणीची घरे असताना अशी गारपीट झाली होती आणि गारांचे थरच्या थर साचले होते, असे जाणकारांनी चिखलदऱ्यातही गारपीट, परतवाड्यात मुसळधारपरतवाडा/चिखलदरा : रविवारी सायंकाळी ५.३० वाजतापासून अचलपूर-परतवाडा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चिखलदरा व परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाली. सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस उशिरा रात्रीपर्यत सुरूच होता. वादळी पावसाने अचलपूर-परतवाडा शहरात अनेक होर्डिंग्ज कोसळले. हातगाडया धारकांची आणि उघड्यावर दुकाने थाटणाऱ्यांची या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. विद्युत पुरवठादेखील काही काळ खंडित झाला होता. या पावसाचा गहू, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. धामणगाव गढी, एकलासपूर, परसापूर, पथ्रोट परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या वादळी पावसाने चिखलदरा व परतवाडा-अचलपूर तालुक्यात कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रविवारी झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील ३०० हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाची नासाडी झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी