शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

दर्यापूर तालुक्यात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:13 AM

तितर-बटेरची सर्रास विक्री, जोडीचे भाव दीडशे ते दोनशे रुपये अनंत बोबडे, येवदा : वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार करणे हे ...

तितर-बटेरची सर्रास विक्री, जोडीचे भाव दीडशे ते दोनशे रुपये

अनंत बोबडे, येवदा : वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा असताना दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पक्ष्यांची शिकार करणारे टोळी सक्रिय झाली आहे. शिकाऱ्यांनी तितर-बटेर पक्ष्यांना जाळ्यात अडकून त्यांची दुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

ग्रामीण भागात तितर-बटेर पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात असतात. विविध पक्ष्यांना पोट भरण्यासाठी ज्वारी, बाजरी हे धान्य लागते. परंतु, सध्या परिसरात शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ज्वारी, बाजरीची पेरणी कमी केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत परिसरात ओलीत असलेल्या भागाकडे या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. बागायती क्षेत्रातील भाजीपाल्यावर असलेले कीटक हे पक्षी टिपतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन पारधी समुदायातील लोकांनी पक्ष्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी डाबके तयार केले आहेत. जाळ्यात तितर-बटेरसह अन्य पक्षीसुद्धा आढळतात. तितर-बटेरचे मांस इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक स्वादिष्ट लागत असल्याने शहरातील या पक्ष्यांना अधिक मागणी असते. शिकारी या पक्ष्यांना जाळ्यात अडकल्यानंतर त्याची बाजारात विक्री करतात.

दर्यापूर तालुक्यातील बहुतांश गावातील बाजार ओट्यावर तितर-बटेरच्या जोड्या विक्रीसाठी असतात. एका जोडीची किंमत दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत असते. शिकारी पैशाच्या लालसेपोटी शहरातील काही निवडक हॉटेलला तितर-बटेरचा पुरवठा करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या परिसरात हरिण, ससा, रानडुक्कर, हरवेल, मोर, टिटवी, पाणकोंबडी, बगळे या प्राण्यांची शिकार करण्याचेही प्रमाण तालुक्यात अधिक प्रमाणात वाढले आहे. पक्ष्यांची शिकार व विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कारवाईची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.