लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सुसाट चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पावसाने कहर केला. नागरिकांना व शेतकऱ्यांसाठी रविवारची रात्र कर्दनकाळ ठरली.तिवस्यासह तालुक्यातील ७० च्यावर वीज खांब वादळाने जमीनदोस्त झाले. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला, तर अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तीन मोठे वीज खांब पडले. टिनाचे खोके महामार्गावर व झाडे जमीनदोस्त झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील सातरगाव व इतर गावात पपई व संत्राझाडे तुटून पडल्याने नागरिकांसह शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने तालुक्यात कोठेही जीवितहानी झाली नाही.स्थानिक पंचवटी चौकातील झाड एका म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. सातरगाव येथील दामोदरआप्पा विजापुरे यांचे एकरभर शेतातील पपईचे पीक जमीनदोस्त झाल्याने त्यांचे एका लाखांवर नुकसान झाले, तर सातरगाव मौजा येथील रवींद्र देशमुख, वैभव वानखडे, श्रीरामदादा देशमुख, भूषण देशमुख, अच्युत वानखडे यांची संत्राबाग वादळी वारा व पावसाने नेस्तनाबूत झाली. आंबिया बहराची फळे गळाली, तालुक्यातील ममदापूर, मोझरी, वणी, गुरुकुंज मोझरी, शिरजगाव मोझरी, शेंदूरजना बाजार, भिवापूर, कारला, कुºहासह अनेक गावांत मोठ मोठे वृक्ष जमीनदोस्त झालीत, तर अनेक घरांवरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाल्याने शेकडो संसार उघड्यावर आली आहेत. शेतकºयांसह नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.रात्र जागून युवक काँग्रेसचे मदतकार्यमहामार्गावरील पंचवटी चौकात टिनपत्र्याची खोके, झाडे रस्त्यावर आले होते, तर वीज खांब खाली पडले होते महामार्ग ठप्प झाला असताना नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद विघ्ने, सचिन गोरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर राऊत, किसन मुंदाने, रोशन वानखडे, अजय शिरभाते, संजय दापूरकर, सुशील खाकसेसह आदी कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले. वैभव वानखडे यांनी प्रशासनाला माहिती देऊन आयआरबीसोबत संपर्क करून महामार्ग मोकळा करवून घेतला. यावेळी नगरपंचायत अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी अख्खी रात्र जागून काढत नुकसानाची पाहणी केली.तिवसा पोलीसही धावले मदतीलाशहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. सर्वत्र काळोख पसरल्याने जीवितहानी होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सतीश जाधव हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी भर पावसात मदतकार्य सुरू केले.जिवंत वीज तारेवर झाडे तुटून पडले होते. तर तालुक्यातील ७० वीज खांब जमीनदोस्त झाल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे तिवसा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी अंधारात काढली. अद्यापही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नसून, तिवसा वीज वितरण कंपनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेततिवसा सातरगाव व तिवसा चांदूर रेल्वे राज्य मार्गावर वृक्ष रस्त्यावर पडल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे. रस्त्यावरील झाडे बाजूला न केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाहनचालक व नागरिकांनी वृक्ष बाजूला केले.मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, त्यात सुसाट वादळी वारा, घरावरील टिनपत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली होती. पण, तालुक्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
तिवसा तालुक्यात गारपिटीसह चक्रीवादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 10:28 PM
शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सुसाट चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पावसाने कहर केला. नागरिकांना व शेतकऱ्यांसाठी रविवारची रात्र कर्दनकाळ ठरली.
ठळक मुद्देशेकडो घरांची टिनपत्रे उडाली : संत्रा, पपईची झाडे जमीनदोस्त