लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या निवडणुकीतही त्यांनी मला भरघोस मते दिली. सर्वांनी मेहनत घेतली. मात्र, काही गोष्टी आपल्या हाती नसतात. लोकशाहीमध्ये कितीही मोठा नेता असला तरी जय-पराजय हा असतोच. जनतेने मला पूर्णपणे नाकारलेले नाही. म्हणूनच मागच्या निवडणुकीत मला मिळालेल्या मतांच्या तुलनेत यंदा मतांमध्ये सहा हजार मतांची अधिक भर घातली. मात्र, मी आता येणार नाही, असा समज कुणी करू नये. मी पळून जाणाऱ्यांमधला नाही. तसा माझा स्वभावही नाही. मी जिल्ह्यातच काम करणार आहे. मतदारांनी जो कौल दिला, तो मला मान्य आहे. जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रपरिषद घेतल्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शनिवारी सांगितले.खरे तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसºयाच दिवशी आभार मानण्यासाठी पत्रपरिषद घेणार होतो. मात्र, माझी पत्नी आजारी होती. ज्या डॉक्टरांची उपचाराची वेळ घेतली होती, ते विदेशात जाणार होते. म्हणून तातडीने मुंबई गाठल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले. यंदा विजयी झालो असतो, तर जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले असते. मला कॅबिनेट मंत्रिपदापासून कुणीही थांबवू शकले नसते. पुन्हा जिल्ह्याचा मोठा विकास करण्याची संधी मिळाली असती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजप-शिवसेना नेत्यांमधील संभाषणाच्या आॅडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. मात्र, त्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम झाला नाही. मी त्यावर आता टीका करणार नाही. भविष्यात समोरासमोर बसून चर्चा करू. अभिजित अडसूळ पुन्हा दर्यापुरातून लढणार का, हा निर्णय आता घेतला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, शिवसेनेने आम्हाला मोठ केलं आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, त्या दिशेने माझी वाटचाल राहणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनाप्रमुखांचे जसे आदेश असतील, त्या दिशेने काम करण्यात येणार असल्याचेही आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.पत्रपरिषदेला माजी आमदार अभिजित अडसूळ, बुलडाण्याचे विजयराव शिंदे, ज्ञानेश्वर धाने, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, महापालिका गटनेता प्रशांत वानखडे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, गजानन वाकोडे, सुधीर सूर्यवंशी, बाळा तळोकार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मी पळून जाणाऱ्यांमधील नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:32 AM
जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या निवडणुकीतही त्यांनी मला भरघोस मते दिली. सर्वांनी मेहनत घेतली. मात्र, काही गोष्टी आपल्या हाती नसतात. लोकशाहीमध्ये कितीही मोठा नेता असला तरी जय-पराजय हा असतोच. जनतेने मला पूर्णपणे नाकारलेले नाही.
ठळक मुद्देपत्रपरिषद। आनंदराव अडसूळ यांच्याद्वारा जनतेचे आभार