बडनेरा पोलीस ठाण्यासमोरच अवैध वाहतुकीचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:56+5:30
नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. यामुळे ये-जा करणाºया इतर वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. बडनेरा शहरासाठी वाहतूक विभागाकडून ५-६ वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत.
श्यामकांत सहस्त्रभोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : मोदी दवाखाना व बडनेरा ठाण्यासमोरील महामार्गावर अवैध वाहतुकीचा अड्डा सुरळीत वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल शहरवासीयांनी केला आहे. वाहतूक नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार येथे होत आहे.
नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. यामुळे ये-जा करणाºया इतर वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. बडनेरा शहरासाठी वाहतूक विभागाकडून ५-६ वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. या सर्वांना विविध गर्दीचे ठिकाण नेमून देण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याकडे त्यांचे लक्ष नसल्याची ओरड शहरवासीयांमध्ये आहे. केवळ वाहने पकडून मेमो फाडण्यातच ते व्यस्त दिसून येतात. नेमक्या कामकाजाकडे लक्ष दिले जात नसल्याने ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बडनेरा पोलीस निरीक्षक व पश्चिम विभाग वाहतूक पोलीस निरीक्षकांनी याची दखल घ्यावी, असे नागरिकांची मागणी आहे.
मोदी दवाखान्यासमोरच कर्णकर्कश आवाज
अवैध वाहतूक करणारी अनेक वाहने मोदी दवाखान्यासमोर उभ्या राहतात. तेथूनच प्रवासी भरतात. प्रवासी मिळण्याकरिता जोरजोराने हॉर्न वाजवितात. त्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना या कर्णकर्कश आवाजाचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात संबंधितांना आदेशित करू की, यापुढे एकही अवैध प्रवासी वाहन मोदी दवाखान्यासमोर उभे राहू नयेत.
- राहुल आठवले,
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
एकाच पॉइंटवर तीन वाहतूक पोलीस कसे?
पोलीस ठाणे ते बसस्थान हे अंतर अगदी थोडेच. एवढ्या अंतरासाठी तीन वाहतूक तैनात राहतात. आधीच या भागातून अवैध वाहनांचा लोंढा असताना चिरीमिरी घेण्याकरिता त्या वाहनांना थांबविले जातात. त्यामुळे अधिक गर्दीत भर पडून महामार्ग सतत विस्कळीत राहतो. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांची आहे.