जिल्ह्यात जन्मदात्यांच्या आत्महत्येत वाढ धक्कादायक :

By admin | Published: June 15, 2015 12:15 AM2015-06-15T00:15:13+5:302015-06-15T00:15:13+5:30

ज्या मुलांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले़, त्या मुलाने विवाह झाल्यानंतर मारले, तर सुनेने घराबाहेर काढले़ वृध्द माता-पित्यांना या वृध्दापकाळात खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज असते.

Increased suicide in district suicides: | जिल्ह्यात जन्मदात्यांच्या आत्महत्येत वाढ धक्कादायक :

जिल्ह्यात जन्मदात्यांच्या आत्महत्येत वाढ धक्कादायक :

Next

एका वर्षात १० आत्महत्या
मोहन राऊत अमरावती
ज्या मुलांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले़, त्या मुलाने विवाह झाल्यानंतर मारले, तर सुनेने घराबाहेर काढले़ वृध्द माता-पित्यांना या वृध्दापकाळात खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज असते. त्याच वयात दोन मुलांमध्ये पुढच्या पिढीला सांभाळण्यासाठी त्यांची विभागणी झाल्यामुळे कौटुंबिक कलहामुळे मागील एक वर्षात जिल्ह्यात १० वृध्द पित्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
पारंपरिक संयुक्त कुटुंबव्यवस्था जाऊन विभक्त कुटुंब पध्दती आली़ मी माझी पत्नी आणि माझे मुलं अशी संकुचित व स्वतंत्र कुटुंबाची व्याख्या झाल्याने घरातील वृध्द माता-पित्यांना आपुलकीेचे कौटुंबिक स्थान राहिले नाही़ वृध्द मातापित्यांना ज्या वयात आधाराची गरज असते त्या वयात माता-पित्यांना केवळ एक अडगळीची वस्तू समजून बाहेर काढले जाते़ जिल्ह्यातील मोठ्या शहरातच नव्हेतर ग्रामीण भागातील वृध्द जन्मदाते एकाकी जीवन मुलांच्या परकेपणाच्या भावनेमुळे जगत आहे़ घरात वृध्दांचा वाढलेला चिडचिडपणा, अनेक आजार झाल्याने अशा क्षुल्लक कारणावरून जन्मदात्यांना वेगळे काढण्याचे प्रकार वाढले आहे़ वृध्दपकाळामध्ये मधुमेह, रक्तदाब, दमा, पोटाचे विकार, हालचालींना मर्यादा, स्मृतीभ्रंश असे आजार प्राधान्याने होतात़
आज जे मुले तरूण आहेत. उद्या त्यांना या वृध्दपकाळाला सामोरे जावे लागणार आहे़ परंतु या बाबीचा विचार न करता सामाजिक भावनेचा वापर करणेही विसरले असल्यामुळे जन्मदात्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे चित्र आहे़
वृध्दापकाळात हवाय आधार
शहरातील मुले मुंबई, पुणेसारख्या शहरात कंपनीत नोकरीला आहे़ वर्षाकाठी केवळ दोन दिवसांसाठी जन्मदात्यांच्या भेटीकरिता येतात. कधी महिन्याकाठी तर कधी तीन महिन्यांतून मनिआॅर्डर येत असल्याची प्रतिक्रिया धामणगाव शहरातील ७५ व्या वयात असलेल्या वृध्द जन्मदात्यांनी व्यक्त केली आहे़ लहानपणापासून सर्वकाही सुविधा पुरवून उच्च स्तराचे शिक्षण दिले़ परंतु वृध्दापकाळात ज्यांचा आधार गरजेचा आहे़ तो मिळत नाही, अशी भावनाही या माता-पित्यांनी व्यक्त केली़
नैतिकतेचे भान येणार कधी ?
नैतिकतेचे भान विसरलेली ही तरूण पिढी पाहून थेट सरकारच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून आले. केंद्र शासनाने वृध्दांसाठी कायदे करण्यास सन २००५ मध्ये प्रारंभ झाला. यावर्षी शासनाने डेस्टिट्यूट अ‍ॅन्ड निडी सिनीयर सिटीजन केअर अ‍ॅन्ड वेलफेअर हे विधेयक तयार केले तर सन २००७ मध्ये अ‍ॅबेडन्ड अ‍ॅन्ड निग्लेक्टेड विडोज अ‍ॅन्ड ओल्ड विमेन वेलफेअर या विधेयकांची रचना केली़ वृध्दांना दिलासा व सरंक्षण मिळण्याच्या दृष्टीने हे दोन्ही विधेयक मंजूर झाले़ मात्र या कायद्याचा पाहिजे त्याप्रमाणात प्रचार-प्रसार होत नसल्यामुळे वृध्द माता-पित्यांना वृध्दाश्रमाचा मार्ग निवडावा लागत आहे़ शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यामातून पुढाकार घेऊन या वृध्दांच्या घरोघरी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजना देणारी सेवा सुरू करण्याची गरज आहे़ विशेषत: मुले नसतील तर रक्ताच्या नातेवाईकांनी वृध्दांचे पालन करावे.

Web Title: Increased suicide in district suicides:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.