जमील कॉलनीत १३ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:59 PM2018-07-15T22:59:09+5:302018-07-15T22:59:26+5:30
इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या मो. अब्रार उल हक मो. इब्राहीम (२८) यांच्या जमिल कॉलनीतील घर फोडून चोरांनी तब्बल १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अब्रार यांनी त्यांच्या दुकानातील संतोष नावाच्या नोकरावर संशय व्यक्त केला असून सद्यस्थितीत तो पसार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या मो. अब्रार उल हक मो. इब्राहीम (२८) यांच्या जमिल कॉलनीतील घर फोडून चोरांनी तब्बल १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अब्रार यांनी त्यांच्या दुकानातील संतोष नावाच्या नोकरावर संशय व्यक्त केला असून सद्यस्थितीत तो पसार आहे.
इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या अब्रार यांच्याकडे सहा जण कार्यरत आहे. त्यापैकी संतोष नावाच्या नोकराला अब्रारने १३ जून रोजी कामावरून काढून टाकले. तर, १४ जून रोजी आणखी दोन नोकर काम सोडून गेले. अब्रार हे मूळचे बऱ्हाणपूरचे आहे. त्यांच्याकडे काम करणारे सहाही जण हेसुद्धा बºहाणपुरचेच आहे. त्यामुळे हे तिन्ही नोकर बऱ्हाणपूर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, संतोष हा बऱ्हाणपूर पोहोचला नसल्याची माहिती अब्रारला मिळाली आहे. शनिवारी सायंकाळी अब्रार जमिल कॉलनीत घरी असताना त्यांनी प्लॉट खरेदीसाठी जमा केलेले १३ लाख २५ हजार आलमारीत ठेवले होते. त्यानंतर ते इर्विन चौकातील दुकानात आले. रात्री ११.३० वाजता ते दुकान बंद करून घरी गेले असता घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त स्थितीत आढळून आले. घरातील आलमारी खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आली. अब्रार यांनी या घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सपाटे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा केला असता आलमारीतील १३ लाख १५ हजारांची रोख लंपास झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, घरात अन्य ठिकाणी ठेवलेली ५ लाख ३५ हजारांची रोख सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले.
आलमारीवर आढळले रक्त
अब्रार यांच्या घरातील आलमारी खाली पडून होती. त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. चोर चोरी करीत असताना त्याच्याकडून आलमारी उघडली नसावी. त्यांनी आलमारी उघडण्याच्या प्रयत्न करून ती आलमारी खाली पाडली. यावेळी त्यांना काही तरी लागले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.