योग्य उपचार केल्यास कोरोना बरा होतो. त्यामुळे आपण सर्वांनी शासकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे आणि अंधश्रद्धेपायी भूमका, परिहार यांच्याकडे जाऊ नये, असे आवाहन केले. चाकर्दा या गावात गेल्या आठवड्यापासून मृत्यूचे सत्र सुरू असून, दरदिवशी एका घरात मृत्यू होत असल्यामुळे गावात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
घराघरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण असल्याने हे रुग्ण उपचारासाठी भूमका, परिवारकडे जात असल्याची माहिती आमदारांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी स्वतः तालुका प्रशासनाला सोबत घेऊन चाकर्दा गावाला भेट दिली. गावातील नागरिकांसोबत त्यांनी आदिवासींच्या कोरकू भाषेत संवाद साधून आजाराविषयी गंभीरता परीलक्षित करीत असतानाच हा रोग बरा होतो, फक्त उपचार घ्या, असे मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनीसुद्धा ग्रामस्थांना आजार झाल्यास जवळच्या प्राथमिक केंद्रात किंवा धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येण्याचे आवाहन केले. कोणत्याही स्थितीत भूमका परिहार यांच्याकडे जाऊ नये, अन्यथा प्रशासनाला ताठर भूमिका घ्यावी लागेल, अशी सूचना त्यांनी दिली.
तत्पूर्वी, आमदार राजकुमार पटेल यांनी अतिदुर्गम राणापिसा आणि त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लाकतू व बोबोई ढाणा या गावांना भेटी देऊन तेथील पाणीसमस्या जाणून घेतल्या. ही समस्या लवकरात लवकर शासनदरबारी मांडून न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदारांसोबत कालू मालवीय, सुरेंद्र देशमुख उपस्थित होते.