रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात

By admin | Published: February 28, 2016 12:40 AM2016-02-28T00:40:47+5:302016-02-28T00:40:47+5:30

स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे.

Kerosene subsidy directly into the bank account | रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात

रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात

Next

पुरवठा विभागाचे आदेश : १ एप्रिलपासून अंमलबजावणी
अमरावती : स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता रॉकेलची सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे.
ज्या ग्राहकांकडे गॅसची जोडणी नाही त्या ग्राहकांना सराकरी स्वस्त धान्य दुकानातून रॉकेलचा पुरवठा केला जातो. केंद्र शासन ४० ते ४५ रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन खरेदी करून ग्राहकांना १५ ते १७ रुपये प्रति लिटर दराने पुरवठा करते. फरकाची २२ ते २३ रुपये ही सबसिडीची रक्कम आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकार ही रक्कम खर्च स्वत: खर्च ग्राहकांना स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध करते. खरेदी केली. रॉकेल हे काळ्या बाजारात विकले जात असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होते. गरीबांना स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध करण्याचा हेतू साध्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांना सबसिडीच्या दरात रॉकेल उपलब्ध न करता शिधा दुकानातून बाजारभावाने रॉकेलची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध नसणाऱ्या कुटुंबाला रॉकेल उपलब्ध केले जाते. केंद्राकडून त्यासाठी राज्य शासनाला दर महिन्याला ५० हजार लिटर रॉकेल केला जात आहे. केंद्र सरकारच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर अमरावती आणि नागपूरमध्ये तर राज्य सरकारच्यावतीने लातुर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार व नांदेडमधील शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे. १ एप्रिलपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १८,४२ दुकानातून ३ लाख ८४ हजार ४२२ ग्राहकांना विना सबसिडी रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

२३ रुपये प्रतिलिटर सबसिडी होणार जमा
शिधापत्रिकेत नोंद असलेल्या एका व्यक्तीला ३ व ३ पेक्षा अधिक व्यक्तींकरिता ४ लिटर रॉकेल दिल्या जाते. शिधापत्रिकेत रॉकेल खरेदीची नोंद केल्यावर सदर ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडीचे २३ रुपये प्रतिलिटर (त्या दिवशीच्या दरानुसार सबसिडी देय) जमा करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Kerosene subsidy directly into the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.