सार्वजनिक गणेशोत्सवावर ‘खाकी’ची नजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:00 AM2021-09-11T05:00:00+5:302021-09-11T05:01:03+5:30

शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम  पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे’, मुखदर्शनऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने केवळ ऑनलाईन अथवा ईलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे दर्शन उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केली. 

Khaki's eye on public Ganeshotsav! | सार्वजनिक गणेशोत्सवावर ‘खाकी’ची नजर !

सार्वजनिक गणेशोत्सवावर ‘खाकी’ची नजर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आयुक्तालयात यावर्षी ३५० सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी बैठक घेतली. त्यात सूचना देण्यात आल्या. सुमारे १८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात राहणार आहेत. 
मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा. अत्यंत साध्या पद्धतीने छोटा मंडप टाकून सार्वजनिक रहदारीस कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंडपांची निर्मिती करावी. 
शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम  पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे’, मुखदर्शनऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने केवळ ऑनलाईन अथवा ईलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे दर्शन उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केली. 

पोलिसांनाही सूचना
गुन्हे परिषदेत पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी सर्व ठाणेदार, सर्व सहायक पोलीस आयुक्त यांनी आगामी सण-उत्सव काळात अवैध धंद्यांना प्रतिबंध घालावे, या हेतूने व बऱ्याच दिवसापासून फरार आरोपींबाबत स्पेशल ड्राईव्ह राबविण्याच्या सूचना दिल्यात. विशेषत: शहरात चैनस्नेचिंग, छेडखानी होणार नाही, याकरिता साधे पोषाखात पोलीस पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

असा आहे पोलीस बंदोबस्त 
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तकरिता तीन डीसीपी, दोन एसीपी, २७ पोलीस निरीक्षक, ९८ पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस अंमलदार, दोन एस.आर.पी. प्लाटून, दोन आर.सी.पी. प्लाटुन, एक क्युआरटी प्लाटून, २५० होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात आहे. शहरात जागोजागी व शहराचे महत्वाचे गर्दीचे ठिकाणी फिक्स पाॅइंट लावण्यात आले आहे. तसेच महिलांचे सुरक्षेकरिता १२ सी.आर मोबाईल, सात दामीनी पथक, बीट मार्शल १६ हे सतत पेट्रोलिंगकरीता नेमण्यात आले आहे.

 

Web Title: Khaki's eye on public Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.