शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

सार्वजनिक गणेशोत्सवावर ‘खाकी’ची नजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 5:00 AM

शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम  पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे’, मुखदर्शनऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने केवळ ऑनलाईन अथवा ईलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे दर्शन उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आयुक्तालयात यावर्षी ३५० सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी बैठक घेतली. त्यात सूचना देण्यात आल्या. सुमारे १८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात राहणार आहेत. मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा. अत्यंत साध्या पद्धतीने छोटा मंडप टाकून सार्वजनिक रहदारीस कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंडपांची निर्मिती करावी. शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम  पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे’, मुखदर्शनऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने केवळ ऑनलाईन अथवा ईलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे दर्शन उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केली. 

पोलिसांनाही सूचनागुन्हे परिषदेत पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी सर्व ठाणेदार, सर्व सहायक पोलीस आयुक्त यांनी आगामी सण-उत्सव काळात अवैध धंद्यांना प्रतिबंध घालावे, या हेतूने व बऱ्याच दिवसापासून फरार आरोपींबाबत स्पेशल ड्राईव्ह राबविण्याच्या सूचना दिल्यात. विशेषत: शहरात चैनस्नेचिंग, छेडखानी होणार नाही, याकरिता साधे पोषाखात पोलीस पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

असा आहे पोलीस बंदोबस्त गणेशोत्सवाच्या बंदोबस्तकरिता तीन डीसीपी, दोन एसीपी, २७ पोलीस निरीक्षक, ९८ पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस अंमलदार, दोन एस.आर.पी. प्लाटून, दोन आर.सी.पी. प्लाटुन, एक क्युआरटी प्लाटून, २५० होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात आहे. शहरात जागोजागी व शहराचे महत्वाचे गर्दीचे ठिकाणी फिक्स पाॅइंट लावण्यात आले आहे. तसेच महिलांचे सुरक्षेकरिता १२ सी.आर मोबाईल, सात दामीनी पथक, बीट मार्शल १६ हे सतत पेट्रोलिंगकरीता नेमण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस