नांदगाव पंचायत समितीमध्ये कोविड नियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:37+5:302021-05-13T04:12:37+5:30
नांदगाव खंडेश्वर : येथील पंचायत समितीमध्ये कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांसह आरोग्य ...
नांदगाव खंडेश्वर : येथील पंचायत समितीमध्ये कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह दैनंदिन दोन शिक्षक व एक लिपिक कार्यरत आहेत.
होम आयसोलेशनमध्ये असलेले ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची भ्रमणध्वनीवरून प्रकृतीबाबत माहिती घेऊन आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवेबाबत त्यांना कोविड नियंत्रण कक्षाकडून सूचना केल्या जातात. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठलराव जाधव, गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट, विस्तार अधिकारी संदीप देशमुख, कमल धुर्वे, दुर्गा खंडारे, प्रवीण खांडेकर, विजय कावळे, दीपक बांबटकर यांच्याद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामपंचायत व गावांना भेटी देऊन नियमित आढावा घेतला जातो व मार्गदर्शनपर सूचना केल्या जात असल्याचे कळविण्यात आले आहे.