पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी : -आता शासकीय भूखंडावरच साकारणार बिझनेस हब धामणगावरेल्वे : राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून आता १४४ हेक्टरच्या शासकीय भूखंडातच हा हब साकारला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५ गावांमधून जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील दोन ठिकाणांची पाहणी केली. यवतमाळ-धामणगाव मार्गावरील सावळा फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. जागेची पाहणी केल्यानंतर जळगांव आर्वी येथील औद्योगिक क्षेत्राची सुद्धा पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मालधक्क्याचा दळणवळणासाठी वापरअमरावती : परिसरातील १४४ हेक्टरमध्ये शासकीय बिझनेस हब साकारला जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाकरिता जमिनीची कमतरता भासल्यास तिवसा मार्गावरील ६८ एकर प्रकल्पामुळे जळगांव औद्योगिक परिक्षेत्राचे रूप पालटणार असून परिसरातील शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धामणगाव-जळगांव आर्वी हा रस्ता सुद्धा ६ पदरी करून त्यामार्गे धामणगाव रेल्वे येथील मालधक्क्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकल्पात आता शासनाने आधी शासकीय जमिनचा वापर करुन हब साकारण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. जळगाव आर्वी येथील औद्योगिक परिक्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा नियोजन अधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, राजगडकर, प्रवीण देसली, दिनेश विधाते, मंगेश कवाडे,श्रीकांत घुगे, जळगांव आर्वी येथील धीरज मुडे आदी उपस्थित होते.दत्तापूर पांदण रस्ता महामार्गाला जोडणारजळगाव आर्वी ते दत्तापूर या पांदण रस्त्याचा विकास करण्यात येणार असून त्या रस्त्याला महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली. या कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जळगांव आर्वीतच होणार कृषीसमृद्धी केंद्र
By admin | Published: August 18, 2016 12:02 AM