लर्निंग लायसन्स ऑफलाईनच बरे, अडचणींचा डोंगर हटत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:42+5:302021-07-07T04:14:42+5:30
(असायमेंट) ( आरटीओच्या गर्दीचा फोटो आहे.) अमरावती/ संदीप मानकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली गेली असली ...
(असायमेंट) ( आरटीओच्या गर्दीचा फोटो आहे.)
अमरावती/ संदीप मानकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली गेली असली तरी अनेक ठिकाणी त्यात अडचणी येत असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन ऑफलाईन लायसन्स काढणारेच अधिक दिसून येत आहेत.
आरटीओत दररोज लायसन्स काढण्यासाठी उमेदवार गर्दी करीत आहेत. अनेक तरुणांना किंवा नागरिकांना सारथी पोर्टलवर लर्निंग लायसन्स काढण्याची प्रक्रियाच माहिती नाही तसेच परीक्षेकरिता अपॉईन्टमेंट कशी घ्यावी, याबद्दल सराव झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी येत असून, त्यांना पुन्हा लायसन्स काढून देणाऱ्या एजंटची मदत घ्यानी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लायसन्स काढून देण्याच्या नावावर पैसे उकळण्याचा गोरखधंदा अव्याहत सुरू आहे. पोर्टलवर परीक्षा देताना हाच तोे उमेदवार आहे किंवा नाही, याची पडताळणीसुद्धा होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बॉक्स:
‘ऑनलाईन’साठी अडचणी काय?
घरबसल्या ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यास १४ जूनपासून आरटीओ विभागाने मुभा दिली आहे. मात्र, ऑनलाईन लायसन्स काढताना उमेदवारांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. कुणाची चाचणी कुणीही पूर्ण करीत आहे. आधार कार्ड व ओटीपी असल्यास कुणीही टेस्ट देऊ शकते. ‘सारथी’ पोर्टलवर दुसऱ्याचा फोटो अपलोड होणे, दुसऱ्यांची नावे, पत्ता येणे तसेच तांत्रिक चुका, ओटीपी घेतल्यानंतर संबधित उमेदवार किंवा अर्जदार देत असलेली परीक्षा तोच देतो का, हे कन्फर्म होत नाही.
बॉक्स:
उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच
सारथी पोर्टलवर लायसन्स काढण्यासाठी अपॉईंटमेंट घेतल्यानंतर जेव्हा त्यांची ऑनलाईन परीक्षा होते तेव्हा उमेदवार वेगळा आणि ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच असे काही प्रकरणे समोर आली आहे. आधी आरटीओमध्ये परीक्षा देणाऱ्या उमदेवारांची पडताळणी व्हायची. त्याचा फोटो, आधार कार्ड व समोर असलेल्या उमेदवाराची विचारपूस व्हायची. पण, ऑनलाईनमुळे आधार कार्ड, ओटीपी आल्यानंतर कुणीही परीक्षा देऊ शकते. त्यामुळे ज्या एजंटकडे उमेदवार जात आहेत, त्यांचेच युवक परीक्षाला बसवून आर्थिक लूट केली जात आहे.
बॉक्स :
शेकडो लायसन्स ऑनलाईन
१ जानेवारी ते ३० जून दरम्यान अमरावती आरटीओमध्ये १९,४७४ जणांनी लर्निंग लायसन्स काढले आहे. ११,५८५ जणांना परमनंट लायसन्स देण्यात आले आहे. १४ जूनपासून शेकडो उमेदवारांनी सारथी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन लायसन्स घेतल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स:
किती लायसन्स दिले?
२०१९
लर्निंग- ५२,९५३
परमनंट - २५,६३२
२०२०
लर्निंग- ५२,०९१
परमनंट - २३,१६२
२०२१
लर्निंग- १९,४७४
परमनंट - ११,५८५
कोट (फोटो आहे)
ऑनलाईन प्रक्रिया करताना अडचणी आल्या. त्यामुळे एजंटच्या माध्यमातून ऑफलाईन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओत आलो.
- तेजन शिंदीजामेकर, अमरावती
कोट (फोटो आहे)
ऑनलाईन लायसन्स काढण्यासाठी काही कागदपत्रे अपलोड होत नव्हती. मी ज्या डायव्हिंग स्कूलकडे क्लास लावला, त्यांच्या सांगण्यानुसार चारचाकी वाहनाचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओत आले आहे.
- रसिका कदम, अमरावती
कोट
लोकांच्या सोयीसाठी कोरोनाकाळात आरटीओमार्फत ही योजना राबविली. तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आमचे काम सुरू आहे.
सिद्धार्थ ठोके, एआरटीओ