जळीत कक्षातील पुस्तकालय लाभदायी
By admin | Published: January 27, 2015 11:25 PM2015-01-27T23:25:47+5:302015-01-27T23:25:47+5:30
महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत
अमरावती : महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात परिचारिकेच्या सहकार्याने हे पुस्तकालय साकारण्यात आले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज विविध रुग्ण दाखल केले जाते, त्यामध्ये जळालेल्या रुग्णांवर वार्ड क्रमांक ४ च्या जळीत कक्षात रुग्णांवर उपचार करण्यात येते. मागील महिन्यात जळीत कक्षात इर्विनचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक अशोक वणकर यांच्या मार्गदर्शनात जळीत कक्षातील इन्चार्ज सिस्टर नाझीया हसन खान यांनी स्वखर्चांने महिलासाठी पुस्तकालय उघडले आहे.
जळीत कक्षातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक पुस्तकातून ज्ञान संपादन करीत आहेत. महिलावर होणाऱ्या अत्याचार, महिला सक्षमीकरण, महिलाचा अधिकारी अश्या विविध पुस्तकाच्या माध्यमातून रुग्ण ज्ञान संपादन करीत आहे. वैद्यकीय अधिकारी बोडखे यांच्या मार्गदर्शनात इनचार्ज सिस्टर नाझिया खान व त्यांच्या सहकारी उषा भगत, विजया मेटकर, प्रीती तायडे, रुपाली राऊत, मीरा सूर्यवंशी, रमा वानखडे व गजानन दहीकर कार्यभार साभांळत आहेत. (प्रतिनिधी)