महाबीजला दणका नव्याने देणार बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:14+5:30

जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले.

Mahabeej will be given new seeds | महाबीजला दणका नव्याने देणार बियाणे

महाबीजला दणका नव्याने देणार बियाणे

Next
ठळक मुद्देशासनाची दखल : सोयाबीनची उगवण नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाबीजच्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांची उगवण नसल्याची तक्रार असलेल्या शेतकऱ्यांना परत बियाणे मिळणार आहे. शासनाने तसे आदेश महाबीजला दिले आहेत. बियाण्यांचा स्टॉक संपल्यास त्यांना धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. याविषयी धोरण ठरविण्यात येणार आहे. यासंदर्भात महाबीजचे प्रादेशिक व्यवस्थापक बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले.
जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले. महाबीज बियाणेसंदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्याची तत्काळ दखल घेऊन तालुकास्तरीय समितीच्या अहवालाची वाट न पाहता, बियाणे बदलून देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांचा परतावा सोयाबीन बियाण्यांद्वारे देण्यात येण्यात येणार आहे. अकोला, वाशिम, हिंगोली येथील महाबीजच्या गोदामात असलेले बियाणे या ठिकाणी मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी जेथून खरेदी केले, तेथेच द्यायचे की कसे, याविषयी उपलब्ध बियाणे व तक्रारी याची सांगड घालण्यात येऊन धोरण ठरविण्यात येत आहे. उपलब्ध बियाणे संपल्यानंतर धनादेशाद्वारे रक्कम देण्यात येण्यात असल्याची माहिती महाबीजद्वारे देण्यात आली.

कॉमन लॉटमध्ये तक्रारी जास्त
महाबीजच्या कॉमन लॉटमध्ये उगवणशक्तीच्या तक्रारी जास्त आहेत व हे सर्व बियाणे विकले गेले आहेत. महाबीजच्या जे-३३५ मध्ये ६०२४ व २५२ या लॉटमध्ये व ९५२३ मध्ये ५९ व ५ या लॉटमध्ये उगवणशक्ती नसल्याच्या तक्रारी जास्त आहेत. नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात २५२ लॉटमधील बियाणे विकले गेले, तर चांदूर बाजार तालुक्यात ५९ व ५ या लॉटमधील बियाणे विकले गेले. याव्यतिरिक्त आणखी चार ते पाच लॉटसाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले.

प्रमाणीकरणानंतर बियाणे खराब का?
राज्य शासनाद्वारे बियाण्यांचे प्रमाणीकरण करण्यात आलेले असताना, उगवणशक्ती का नाही की यामध्येही घोळ आहे, असा शेतकºयांचा सवाल आहे. लॉट पासिंग करताना बियाणे ओले असल्याचीच शक्यता आहे. त्यामुळे फंगस चढल्याने उगवणशक्ती कमी झाली. याव्यतिरिक्त आणखी काही कारणेदेखील आहेत. बियाणे राज्य शासनाच्या एजन्सीद्वारे प्रमाणित करण्यात आल्यानंतरच महाबीजद्वारे विक्री करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बियाण्यांची पेरणी झाल्यानंतर उगवणशक्ती नसल्याची बाब उघड झाली आहे.

उगवण न झालेल्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारदार शेतकºयांना परत बियाणे देण्यात येणार आहे. बियाणे उपलब्ध न झाल्यास धनादेश देण्यात येतील. याविषयी शासनाचे पत्र प्राप्त आहे.
- एस.पी. देशमुख, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

Web Title: Mahabeej will be given new seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.