Maharashtra Election 2019 ; 'भाजपानुकूल मतदारसंघ ऐनवेळी सेनेला देणे नडले'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:40 AM2019-10-27T01:40:05+5:302019-10-27T01:42:21+5:30

मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे.

Maharashtra Election 2019 ; 'BJP refuses to give back to Sena at the time' | Maharashtra Election 2019 ; 'भाजपानुकूल मतदारसंघ ऐनवेळी सेनेला देणे नडले'

Maharashtra Election 2019 ; 'भाजपानुकूल मतदारसंघ ऐनवेळी सेनेला देणे नडले'

Next
ठळक मुद्देभाजपच्या मतांचा टक्का वाढला : दर्यापुरात 'स्थानिक नेतृत्त्वा'ची घाई, मेळघाटात गैरआदिवासी मतांचा फटका

गणेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायकच आहेत. त्यासाठीची कारणमीमांसा आम्ही सुरू केली आहे. सामान्यांच्या अपेक्षापूर्तीत संघटना कुठे कमी पडली, हेदेखील आम्ही जाणून घेणार आहोत. तसे बदल करून चूक सुधारली जाईल , अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दिनेश सूर्यवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. जिल्ह्यात भाजपचे पानीपत का झाले, याची चर्चा तोंडोतोंडी आहे. संघटनेचा प्रमुख चेहरा असलेले दिनेश सूर्यवंशी हे पराभवाची कारणमीमांसा कशी करतात, हे आम्ही 'लोकमत'च्या वाचकांसाठी जाणून घेतले.
मेळघाटात झालेल्या पराभवाचे समीकरण सूर्यवंशी यांनी मांडले. मेळघाट हा आदिवासींचा प्रांत अशीच ओळख असली तरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गैरआदिवासींची संख्यादेखील तेथे महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. गवळी, मालविय, खाटीक, कलाल, गवलान, बलई या समाजघटकांचा त्यात समावेश आहे. या गैरआदिवासी मंडळींचे एकत्रित मतदान तब्बल ३५ ते ३८ टक्के आहे. आदिवासींसाठी आपुलकीचा असलेला; परंतु गैरआदिवासींमध्ये असुरक्षितता निर्माण करणाऱ्या पेसा या कायद्याचा नियोजनबद्धरीत्या अपपप्रचार करण्यात आला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याचा परिणाम झाला असा की, कधी नव्हे ते गैरआदिवासी मतदार भाजप उमदेवाराविरुद्ध ताकदीने एकवटले. घाटपायथ्याला अचलपूरजजीक ९० बुथ होते. 'पेसा'च्या बागुलबुव्यामुळे तेथेही अपक्ष राजकुमार पटेलांना एकतर्फी मतदान झाले.
दर्यापुरात अनुकूल स्थिती असताना भाजपला 'डॅमेज' होईल, अशी स्थिती भाजपच्या 'स्थानिक नेतृत्त्वा'ने निर्माण केली. लोकसभेत हार झाल्यानंतर सीमा सावळे या नवख्या नि परक्या उमेदवाराला दर्यापुरातून लढविण्याची आश्चर्यकारक घाई केली गेली. सावळेंना तिकीट न मिळाल्यामुळे रमेश बुंदिले यांनी विकास केला नसल्याचा प्रचार सावळेंनी केला. स्वत: सावळे यांनीही १८-१९ हजार मते घेतली. सावळेंना शब्द देऊन त्यांच्या आशा पल्लवित करण्याची घाई करणाºया 'स्थानिक नेतृत्त्वा'ने सावळेंना भाजपविरुद्ध बंडखोरी करून देण्याची जबाबदारी मात्र पार पाडली नाही. पक्षाला त्याची किंमत चुकवावी लागली. 'स्थानिक नेतृत्त्व' म्हणजे कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माझ्यासकट कुणीही असू शकेल, असे उत्तर त्यांनी दिले.
मोर्शी मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपविल्यावर मतदारसंघ अनुकूल असणे अपेक्षित होते. तसे नसेल तर तो अनुकूल करण्यासाठीची आवश्यक ती उपाययोजना करता यावी, असे सामर्थ्य पक्षाने पालकमंत्री अनिल बोंडे यांना बहाल केले होतेच. काही अंतर्गत बाबींवर मी त्यांना अवगत केले होते; अंतिम निर्णय त्यांना घ्यावयाचे होते.
तिवस्याबाबत कमालीचे 'कॉन्फिडन्ट' असलेले सूर्यवंशी म्हणतात, 'तेथे कमळ फुललेच असते.' मोठा कालावधी देऊन भाजपने 'नरीश' केलेला तो मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. भाजपजन नाऊमेद झाले. मी तरीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चेतवित ठेवले. नवख्या राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकुरांना काट्याची टक्कर दिली, त्याचे प्रमुख श्रेय अर्थातच् भाजपच्या श्रमाला द्यावे लागेल. आताही सांगतो, तेथे कमळावर उमेदवार उभा केला असता, तर यशोमतींना पराभूत व्हावेच लागले असते!
तिवस्याचीच पुनराववृत्ती अचलपुरात झाली. ऐनवेळी मतदारसंघ शिवसेनेला दिला गेला. काय साध्य झाले ते सर्वांसोर आहेच.
शिवसेनेला बडनेरा वगळता इतर दोन मतदारसंघ मुळीच सोडू नये, अशी आमची आग्रही मागणी होती. तरीही ते सेनेला देण्यामागे वरिष्ठांचे काही नियोजन असेल; पण स्थानिक पातळीवर त्याचा विपरीत परिणाम इतरही मतदारसंघांवर झाला. जिल्हाभरातील भाजप संघटनेत अनुत्साह निर्माण झाला, हा मुद्दा संघटनेला लक्षात घ्यावाच लागणार आहे. निर्णायक संख्येत असलेल्या परंपरागत मतदारांना अमरावती जिल्ह्यात प्रतिनिधीत्त्व देऊन त्यांची सन्मानपूर्वक दखल घेण्याचे राहून गेल्याचा मुद्दाही त्यांनी चर्चेदरम्यान अधोरेखित केला.

हल्लीची भाजप ओबीसी, मराठा ओरीएन्टेड
प्रमोद महाजन यांच्या काळात ओबीसींना संघटनेत मुख्य प्रवाहात सामिल करून घ्यावे, राज्यात संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठा समाजाला नेतृत्त्वसंधी द्यावी, असा विचार मांडला गेला. तेव्हापासून भाजपात ओबीसी, मराठा मुख्य प्रवाहात आलेत.
- अन् परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला
भाजपने सातत्याने परिश्रम घेऊन अनेक मतदारसंघांची जोपासना केली. तळागाळातील कार्यकर्त्यांनीही त्यासाठी जीव ओतला. संघटनेचे कर्तव्य या नात्याने विधानसभा निवडणूक येईपर्यंत आम्ही भाजपसाठी जमिन सुपीक करवून ठेवली. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'BJP refuses to give back to Sena at the time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.