-----------------------------------
४ जूनपर्यंत पावसाची शक्यता
अमरावती : जिल्ह्यात ४ जून संपूर्ण तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजा व जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
विभागात तुरळक ठिकाणी गारपीट तथा वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
----------------------
सीएच निकम यांचा कार्यकाळात वाढ
अमरावती : दोन वर्षांची कार्यकाळ वाढल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक मे अखेर निवृत्त होणार होते. मात्र, आरोग्य विभागाद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्याचे असल्याचे सांगण्यात येते.
--------------------------
वादळासह पावसाने फळपिकांचे नुकसान
अमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून कुठे ना कोठे वादळासह पाऊस होत असल्याने संत्रा, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनावर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
--------------------
कोरोना समित्या ॲक्टिव्ह केव्हा? (फोटो/कोरोना)
अमरावती : ग्रामीण भागात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्राम समित्यांची महत्त्वाची आहे; मात्र दुसऱ्या लाटेत या समित्या निक्रिय झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे प्रशासनाने सांगितले.