विद्यार्थिनीसोबत विवाहाचा कट उधळला

By admin | Published: February 28, 2016 12:38 AM2016-02-28T00:38:59+5:302016-02-28T00:38:59+5:30

आईने युवकावर व्यक्त केलेला संशय, कार्यकर्त्यांनी वेळेवर केलेली धावपळ व पोलिसांनी समयसुचकता दाखवीत पार पाडलेली कर्तव्यनिष्ठा यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून ...

Marriage was cut off with the girl | विद्यार्थिनीसोबत विवाहाचा कट उधळला

विद्यार्थिनीसोबत विवाहाचा कट उधळला

Next

पोलिसांची तत्परता : भिलावा लावून हातावरील नाव खोडले
अचलपूर : आईने युवकावर व्यक्त केलेला संशय, कार्यकर्त्यांनी वेळेवर केलेली धावपळ व पोलिसांनी समयसुचकता दाखवीत पार पाडलेली कर्तव्यनिष्ठा यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेऊन विवाह करण्याचा कट उधळला. प्रेमवीराला कारागृहाची हवा खावी लागत आहे. हा लव जिहादचाच प्रकार असल्याची जोरदार चर्चा अचलपुरातील चौकाचौकांत होत आहे.
अचलपूर येथील काळा हनुमान मंदिराजवळील एका भागात हातमजुरी करणारे दाम्पत्य राहात असून त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आयटीआय करीत होती. तिचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना माल नेण्यासाठी आॅटो लागत असे. सदर विद्यार्थिनीचे वडील दोन ते तीन वर्षांपासून भाजीपाला ने-आण करण्यासाठी शे. फिरोज शे. युनूस (२१) यांचा आॅटो सांगत असत. दरम्यान, सदर मुलीवर आॅटोचालकाची नजर पडली. त्याने तिला प्रेमजाळात अडकविले व २ फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगी घरून बेपत्ता झाली. यासंबंधी मुलीच्या वडिलाने अचलपूर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुषंगाने ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपीला बोलावून चौकशी केली. पण काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा फिरोजला बोलावून ठाणेदार ठाकरे यांनी प्रश्नाांची सरबत्ती सुरू केली असता सदर विद्यार्थिनीला आपणच पळवून नेल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान तिच्या मामांनी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तीला घेवून पोलीस स्टेशन अचलपूर येथे हजर झाले. युनूसविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले. (प्रतिनिधी)

मामाच्या घरी ती परतली
माझी भाची २४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता माझ्या घरी एकटीच आली. ती काही बोलत नव्हती. तिच्या बॅगमध्ये ९७० रुपये निघाले, असे विद्यार्थिनीच्या मामांनी सांगितले.

आई-वडील मुलांच्या किंवा मुलींच्या हिताचा निर्णय घेत असतात. भावनेत येऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. एखाद्या विद्यार्थिनीला कुणी सख्याहरी मजनू त्रास देत असल्यास किंवा दबाव टाकत असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी किंंवा माझ्याशी संपर्क करावा.तसेच या प्रकरणात अल्पवयीन विद्यार्थिनीला अपहरण करण्यात ज्यांनी मदत केली असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नरेंद्र ठाकरे, ठाणेदार, अचलपूर

सदर अल्पवयीन विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात आणले तेव्हा ती प्रचंड दडपणाखाली दिसत होती. तिला खूप प्रेमाने समजावे लागले. तेव्हा ती बोलायला लागली. प्रथम ती आई-वडिलांकडे जायला तयार नव्हती. पण सायंकाळी आपल्या घरी जाण्यास तयार झाली.
- पद्मशीला तिरपुडे, पी.एस. आय., अचलपूर

Web Title: Marriage was cut off with the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.