शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
4
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
5
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
6
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
7
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
8
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
9
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
10
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
11
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
12
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
13
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
14
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
15
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
16
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
17
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
18
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
19
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
20
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!

विद्यार्थिनीसोबत विवाहाचा कट उधळला

By admin | Published: February 28, 2016 12:38 AM

आईने युवकावर व्यक्त केलेला संशय, कार्यकर्त्यांनी वेळेवर केलेली धावपळ व पोलिसांनी समयसुचकता दाखवीत पार पाडलेली कर्तव्यनिष्ठा यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून ...

पोलिसांची तत्परता : भिलावा लावून हातावरील नाव खोडले अचलपूर : आईने युवकावर व्यक्त केलेला संशय, कार्यकर्त्यांनी वेळेवर केलेली धावपळ व पोलिसांनी समयसुचकता दाखवीत पार पाडलेली कर्तव्यनिष्ठा यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेऊन विवाह करण्याचा कट उधळला. प्रेमवीराला कारागृहाची हवा खावी लागत आहे. हा लव जिहादचाच प्रकार असल्याची जोरदार चर्चा अचलपुरातील चौकाचौकांत होत आहे. अचलपूर येथील काळा हनुमान मंदिराजवळील एका भागात हातमजुरी करणारे दाम्पत्य राहात असून त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आयटीआय करीत होती. तिचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांना माल नेण्यासाठी आॅटो लागत असे. सदर विद्यार्थिनीचे वडील दोन ते तीन वर्षांपासून भाजीपाला ने-आण करण्यासाठी शे. फिरोज शे. युनूस (२१) यांचा आॅटो सांगत असत. दरम्यान, सदर मुलीवर आॅटोचालकाची नजर पडली. त्याने तिला प्रेमजाळात अडकविले व २ फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगी घरून बेपत्ता झाली. यासंबंधी मुलीच्या वडिलाने अचलपूर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुषंगाने ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपीला बोलावून चौकशी केली. पण काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा फिरोजला बोलावून ठाणेदार ठाकरे यांनी प्रश्नाांची सरबत्ती सुरू केली असता सदर विद्यार्थिनीला आपणच पळवून नेल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान तिच्या मामांनी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तीला घेवून पोलीस स्टेशन अचलपूर येथे हजर झाले. युनूसविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले. (प्रतिनिधी)मामाच्या घरी ती परतलीमाझी भाची २४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता माझ्या घरी एकटीच आली. ती काही बोलत नव्हती. तिच्या बॅगमध्ये ९७० रुपये निघाले, असे विद्यार्थिनीच्या मामांनी सांगितले.आई-वडील मुलांच्या किंवा मुलींच्या हिताचा निर्णय घेत असतात. भावनेत येऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. एखाद्या विद्यार्थिनीला कुणी सख्याहरी मजनू त्रास देत असल्यास किंवा दबाव टाकत असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी किंंवा माझ्याशी संपर्क करावा.तसेच या प्रकरणात अल्पवयीन विद्यार्थिनीला अपहरण करण्यात ज्यांनी मदत केली असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - नरेंद्र ठाकरे, ठाणेदार, अचलपूरसदर अल्पवयीन विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात आणले तेव्हा ती प्रचंड दडपणाखाली दिसत होती. तिला खूप प्रेमाने समजावे लागले. तेव्हा ती बोलायला लागली. प्रथम ती आई-वडिलांकडे जायला तयार नव्हती. पण सायंकाळी आपल्या घरी जाण्यास तयार झाली. - पद्मशीला तिरपुडे, पी.एस. आय., अचलपूर