अकोला, दि. २६- खेडकर नगरमधील रॉयल पॅलेस येथील विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रविवारी दुपारी करण्यात आला होता; मात्र विवाहितेने आत्महत्या केली नसून तिची पती व सासरच्या मंडळींनी गळा आवळून हत्या केल्याचा गुन्हा सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दाखल केला. या हत्या प्रकरणातील आरोपी पती योगेश वडतकर याला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथील रहिवासी अलका मदनराव काळमेघ यांची सर्वात मोठी मुलगी अम्रिता ऊर्फ राणी हिचा विवाह ७ नोव्हेंबर २00९ रोजी अंजनगाव तालुक्यातीलच चिंचोली येथील रहिवासी तसेच दहीहांडा येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले योगेश मधुकरराव वडतकर याच्याशी झाला होता. अम्रिताचे पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच तीन नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे या सातत्याने पैशासाठी तिचा छळ करीत होते व वेळोवेळी आईकडून पैसे घेऊन ये, असा दबाव आणून तिला नेहमी मारहाण करीत होते. अम्रिताने अनेकदा हा प्रकार तिची आई अलका काळमेघ, लहान बहिणी अंकिता टेकाडे व श्रद्धा अतकरे यांना भ्रमणध्वनीवर सांगितला; मात्र पती-पत्नीमधील वाद आज ना उद्या ठीक होतील या आशेने तिची आई अम्रिताला समजावून सांगत होती; मात्र २५ सप्टेंबर रोजीअम्रिताने आत्महत्या केल्याचे योगेशने अम्रिताच्या परिवारला सांगीतल्यावर सर्वांंना धक्का बसला योगेशयाने रविवारी दुपारी अम्रिताला एका खासगी रुग्णालयात आणले; मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले होते. यानंतर योगेश मृतदेह सोडून निघून गेला. दरम्यान अम्रिताच्या नातेवाइकांनी तिला सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल केले यावेळी तिचा डेंग्यूचा आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे योगेशने अम्रिताच्या माहेरच्यांना सांगितले; मात्र माहेरच्यांनी त्याच्यावर विश्वास न ठेवल्याने हे खून प्रकरण उघड झाले. सोमवारी योगेश वडतकर व त्याचे आई-वडील आणि तीन बहिणींनी अम्रिताचा गळा आवळून खून केल्याची तक्रार अलका काळमेघ यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये केली. या प्रकरणी पोलिसांनी अम्रिताचा पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ४९८ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून अम्रिताचा पती योगेश वडतकारला अटक केली. विवाहिता गोल्ड मेडलिस्टयोगेश वडतकर यांची पत्नी अम्रिता वडतकर ही एम. ए. इंग्लिश आहे. अमरावती विद्यापीठातून ती एम. ए. इंग्लिशमध्ये गोल्ड मेडालिस्ट असून तिच्या मृत्यूच्या दिवशीच खंडेलवाल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीपत्र मिळाल्याची माहिती आहे. एका खासगी शिकवणी वर्गामध्येही अम्रिताने विद्यार्थ्यांंंना शिक्षणाचे धडे दिले आहेत.पतीचे विवाहबाहय़ संबंधयोगेश वडतकर हे दहीहांडा येथील कनिष्ठ महाविद्यालयावर प्राध्यापक असून त्यांचे विवाहबाहय़ संबंध असल्याचा आरोप अम्रिताच्या दोन्ही बहिणींनी केला आहे. योगेश वडतकर हे दुसर्या स्त्रीला घरात आणण्यासाठी अम्रितावर दबाव आणत असत. एवढेच नव्हे तर याच प्रकारावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रचंड वाद झाला होता.
विवाहितेची गळा आवळून हत्या
By admin | Published: September 27, 2016 2:54 AM