सीएए, एनआरसीविरोधात मोर्शीत जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:30+5:30
शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडणारे कायदे आहेत. आम्ही या दोन्ही कायद्याला मानत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’ व एनआरसीविरोधात शुक्रवारी अल्पसंख्याक व संविधान बचाव कृती समितीच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सभेद्वारे दोन्ही कायद्यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शहरासह तालुक्यातील हजारो जण यात सहभागी झाले.
शुक्रवारी दुपारची नमाज अदा करून स्थानिक पेठपुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक संघटनांचे पदाधिकारी तथा संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए आणि एनआरसी हे धर्माच्या नावावर देशात फूट पाडणारे कायदे आहेत. आम्ही या दोन्ही कायद्याला मानत नाही. जो कायदा संविधानाच्या कलम १४-१५ आणि २१ च्या विरोधात आहे, त्यामुळे देशात अराजकता वाढविणाऱ्या विचारधारेची निर्मिती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चाच्या अनुषंगाने काढलेल्या पत्रकानुसार, आपण एनआरसीला मानत नाही. तो कायदा राज्यात लागू झाल्यास आपण नोंदणी करणार नाही. आपण सीएए व एनआरसी कायद्यांना आपला विरोध राहील, असे पत्रकात नमूद केले आहे.