अल्पवयीन मुलीला डांबून २० दिवस बलात्कार

By admin | Published: February 26, 2016 12:24 AM2016-02-26T00:24:18+5:302016-02-26T00:24:18+5:30

अचलपूर येथील वस्तीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २० दिवस बलात्कार झाला.

Minor girl raped for 20 days | अल्पवयीन मुलीला डांबून २० दिवस बलात्कार

अल्पवयीन मुलीला डांबून २० दिवस बलात्कार

Next

अचलपुरातील घटना : प्रेमाच्या आणाभाका घेऊन केली फसवणूक
परतवाडा : अचलपूर येथील वस्तीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २० दिवस बलात्कार झाला. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. आरोपीने मुलीला येथीलच एका झोपडीत डांबून ठेवल्याचेही समोर आले आहे.
अचलपूर येथील अल्पवयीन मुलगी २ फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने पालकांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी एका इसमाला संशयाच्या आधारे वारंवार विचारपूस केली असता त्याने हा प्रकार उघड केला. शेख फिरोज शेख युनूस (रा.किला, अचलपूर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीने दिलेल्या बयाणानुसार, २ फेबु्रवारीपासून ती संबंधित आरोपीसोबत परतवाड्याच्या स्मशानभूमी मागील झोपडीमध्ये राहत होती. या २० दिवसांमध्ये आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने पोलिसांना सागितले. आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेत्न त्यानंतर तिच्या सहमतीने तो त्या अल्पवयीन मुलीला परतवाडा येथील झोपडीत घेऊन गेला. विशेष म्हणजे तो दररोज मुलीच्या पालकांसमोर वावरत होता.
त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल यत्किंचितही शंका आली नाही. मात्र, काही दिवसांनी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोन दिवसांपूर्वी अचलपूर पोलिसांत तक्रार नोंदवून आरोपीवर संशय व्यक्त केला होता.

कॉल डिटेल्सवरुन लागला पत्ता
परतवाडा : प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन व ठाणेदारांनी दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीच्या एका नातलगाच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा कळला. परंतु याची कुणकुण लागताच आरोपीने मुलीला त्या झोपडीतून परतवाड्यातील त्याच्या घरी रवाना केले. मात्र, पोलिसी हिसका दाखविताच आरोपीने मुलीचा पत्ता दिला. मुलीने सर्व प्रकार कथन केला. मुुलीची वैद्यकीय तपासणी केली. आरोपीविरुद्ध ३६३, ३७६ पोस्को सेक्शन ४ प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Web Title: Minor girl raped for 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.