गौण खनिज तस्करांचा हैदोस कायम

By admin | Published: February 25, 2016 12:07 AM2016-02-25T00:07:27+5:302016-02-25T00:07:27+5:30

तालुक्यातील रेती लिलावाला मुहूर्तच सापडत नसल्याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे.

Minor mineral smugglers turned hazardous | गौण खनिज तस्करांचा हैदोस कायम

गौण खनिज तस्करांचा हैदोस कायम

Next

श्यामकांत पाण्डेय धारणी
तालुक्यातील रेती लिलावाला मुहूर्तच सापडत नसल्याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात महसुली नदी-नाल्यांसह व्याघ्र प्रकल्पातील नद्यांवर सुद्धा तस्करांनी आपला अधिकार गाजवित अवैध उत्खनन धडाक्यात सुरू केले आहे तर महसूल अधिकारी आणि व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने गौणखनिज तस्करांचे चांगलेच फावले आहे.
धारणीपासून २२ किलोमीटर अंतरावरील पाटीया गावाच्या पूर्वेस उत्तर-दक्षिणवाहिनी भंवर नदी आहे. या नदीच्या तांगडपाटी घाटात पाटीया येथील ट्रॅक्टर मालकाने हैदोस घातला आहे. त्या ट्रॅक्टर मालकाने गावातील घरकूलधारकांना रेती व डब्बरचे अवैध उत्खनन करून लाभार्थ्यांना पुरवठा केला जात. यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न काढता व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील भंवर नदीपात्रातून अवैध उत्खनन करून हा पुरवठा सुरू आहे.
या ट्रॅक्टर मालकाच्या दादागिरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरकूल लाभार्थ्यांसह गावात सुरू असलेल्या पाणी पुरवठा टाकीचे बांधकामातही हाच रेती पुरवठा सुरू आहे. रेतीसाठी प्रती ब्रास २ हजार तर डब्बरसाठी प्रती ब्रास १५०० रुपये उकळले जात आहेत. रेती व डब्बरची कोणतीही रॉयल्टी या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर मालकाने न दिल्याने याची चौकशी तहसीलदारांनी करण्याची आवश्यकता आहे.
गावात शेकडो ब्रास रेती व डब्बर याच पोलीस पाटीलच्या ट्रॅक्टरद्वारे करण्यात आल्याने याला स्थानिक तलाठ्याचीही कृपा असल्याचे बोलले जाते. याबाबत एसडीओ एस. षणमुगराजन यांचेशी संपर्क केला असता त्यांनी एका पथकाची पाटियाकडे रवानगी केल्याचे सांगितले. उत्खननाने महसूल तर बुडत आहेच. पण पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Minor mineral smugglers turned hazardous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.