जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:30 PM2017-11-26T23:30:46+5:302017-11-26T23:30:53+5:30

सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची योजना येत्या शैक्षणिक वर्षात बंद होणार आहे.

Mission bank accounts in Zilla Parishad schools | जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन बँक खाते

जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन बँक खाते

Next
ठळक मुद्देथेट रक्कम : आता पुस्तकाची रक्कम बँक खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची योजना येत्या शैक्षणिक वर्षात बंद होणार आहे. विद्यार्थ्यांना आता शाळांमध्ये मोफत पुस्तके न देता त्याऐवजी पुस्तकांची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. अशाप्रकारे पैसे देऊन विद्यार्थ्यांनी त्या रकमेतून पुस्तकेच खरेदी करतील का, अशी शंका शाळा शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अंशत: व पूर्णत: अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाºया सर्व विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना महत्त्वपूर्ण होती.
या योजनेत आता बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पुस्तके व यासाठी बँक खाते उघडण्याची प्रक्रिया शाळांना पूर्ण करणे बंधनकारक असून बँक खाते राष्टÑीयीकृत बँकांत शून्य रकमेचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बँक खात्याला आधारकार्ड जोडण्यास सांगण्यात आले आहे. बँक खाते उघडण्यासाठी बिटनिहाय किंवा केंद्रनिहाय शिबिर घेण्यासंदर्भात संबंधित बँक व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घ्यावे तसेच खाते उघडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती हार्ड कॉपीसह डिसेंबरअखेर पर्यंत शिक्षण विभागाला सादर करावी लागणार आहे.
या खात्यावर केवळ विद्यार्थ्यांचा एकट्याचा हक्क नसून हे खाते संयुक्तरीत्या आईसमवेत काढण्यात येणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास इतर पालक अभिभाषक यांच्या नावाने संयुक्त खाते काढण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिल्या आहेत. पुस्तकांसाठी मिळालेली रक्कम त्याच कारणासाठी वापरली जावी, हा यामागील उद्देश असल्याचे कळते. मात्र यापूर्वीच शिष्यवृत्ती व अन्य कारणांसाठी काही विद्यार्थ्यांनी वडीलासमवेत संयुक्तरीत्या बँक खाती उघडली आहेत. आता या विभागात आईसमवेत खाते संयुक्तरीत्या असावे, असे सांगितले जात असल्याने किती खाती उघडायची, असा प्रश्न शाळा कर्मचारी उपस्थित करीत आहे.
पाठ्य पुस्तकांचे अनुदान येत्या शैक्षणिक सत्रापासून बँक खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यी व आईचे संयुक्त खाते असावे लागणार आहे. त्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाºयांना अशी खाते काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- आर.डी. तुरणकर,
शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: Mission bank accounts in Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.