शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

बसस्थानक परिसरात ‘मॉकड्रिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:11 AM

अमरावती : आगामी सण-उत्सव, स्वातंत्र्य दिन व विविध संघटनांच्या हालचाली लक्षात घेता सुरक्षिततेच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ...

अमरावती : आगामी सण-उत्सव, स्वातंत्र्य दिन व विविध संघटनांच्या हालचाली लक्षात घेता सुरक्षिततेच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमरावती कार्यक्षेत्रात बेस्स्ट प्राईस येथे १७ जुलै रोजी व १९ जुलै रोजी बसस्थानक अमरावती येथे दहशतवाद विरोधी कक्ष, जलद प्रतिसाद पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथक, पो.स्टे. सिटी कोतवाली व बडनेरा यांचे संयुक्त पथकासह माॅक ड्रिल घेण्यात आली. माॅक ड्रिल मध्ये दरम्यान बेस्स्ट प्राईस येथील ट्रान्सपोर्ट सेक्शन व बसस्थानक अमरावती येथील पार्सल विभागामध्ये ३ असामाजिक तत्त्वाचे इसम /दहशतवादी यांनी काही कर्मचाऱ्यांना बंधक केल्याचे भासवून दोन्ही ठिकाणी पथकाचे प्रशिक्षित कमांडोनी बंदकांची सुटका केल्याचे दाखविले.

सदर दोन्ही माॅक ड्रिल पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असून माॅक ड्रिलच्या वेळेस विशेष शाखेच्या पो.नि. नीलिमा आरज, बीडीडीएस चे पो.नि. जयंत राऊत, कोतवाली येथील वरिष्ठ पो.नि. राहुल आठवले, बडनेरा येथील वरिष्ठ पो.नि. वंजारी यांच्यासह आरपीफ, जीआरपी, एटीएस व एटीसीचे अधिकारी व अंमलदार हजर होते.