मेळघाट-मध्य प्रदेश सीमेवरील जंगल परिसरात उसळला आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:24 AM2019-06-02T01:24:57+5:302019-06-02T01:25:44+5:30

मेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया जंगलात आगडोंब उसळला आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता खामला परिसरातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आणि मडकी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये पाचशेपेक्षा अधिक हेक्टर वनक्षेत्राची राखरांगोळी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Molaghat-Madhya Pradesh, on the border of the forest, Agadong | मेळघाट-मध्य प्रदेश सीमेवरील जंगल परिसरात उसळला आगडोंब

मेळघाट-मध्य प्रदेश सीमेवरील जंगल परिसरात उसळला आगडोंब

Next
ठळक मुद्देसुरक्षितता वाऱ्यावर। घटांग परिक्षेत्रात दोन ठिकाणी आग; पाचशे हेक्टरवरील जंगल खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया जंगलातआगडोंब उसळला आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता खामला परिसरातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आणि मडकी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये पाचशेपेक्षा अधिक हेक्टर वनक्षेत्राची राखरांगोळी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मेळघाटच्या सीमारेषा मध्यप्रदेशच्या जंगलाला लागून असल्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता खोºयात लागलेल्या आगीने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या खामला कुकरू परिसरातील जंगलात आग पसरली होती. हवेच्या वेगाने आग वाढत होती. गत आठवड्यात याच परिसरात रात्री आगडोंब उसळला होता. घटांग वनपरिक्षेत्राधिकारी-कर्मचारी परतवाडा-अमरावतीहून येत असल्याने जंगल वाºयावर आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमके किती हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाली, हे समजू शकले नाही.
आदिवासींचा असहकार
वन व व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलातील आग विझविण्यात स्थानिक आदिवासींची मदत घेतली जाते. परंतु, अलीकडे वनविभाग आणि आदिवासींमधील संघर्ष पाहता, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिकांमध्ये असहकारची भावना आहे.

जंगलाची फाळणी वातानुकूलित कक्षात बसून
व्याघ्र प्रकल्पाचा परिसर नुकताच वाढविण्यात आला. दुसरीकडे अतिसंरक्षित परिक्षेत्रात येणाºया गावांचे पुनर्वसनसुद्धा केले जात आहे. तरीदेखील मेळघाटातील जंगलात आगडोंब उसळला असल्याचे विदारक चित्र पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचा विषय ठरले आहे. अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा परिसर वाढविताना वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या जंगलाची फाळणी वातानुकूलित कक्षात बसून केल्याचा फटका मेळघाटातील जंगल आणि वन्यसृष्टीला बसत आहे.

अधिकारी अनभिज्ञ
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत मोथा, मडकी, धामणगाव गढीचा परिसर थेट २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या घटांग वनपरिक्षेत्र कार्यालयाशी जोडण्यात आला आहे. विरुद्ध दिशेत जोडले गेल्याने जंगलातील आग, वन्यप्राण्यांची शिकार किंवा मृत्यू झाल्यास कुठलीच माहिती मिळत नसल्याचे वास्तव आहे. संबंधित वनकर्मचारी राहताना दिसत नाही.

Web Title: Molaghat-Madhya Pradesh, on the border of the forest, Agadong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.