घरून पैसे? चोरी लावता काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:11+5:302021-09-23T04:15:11+5:30
बसमध्ये प्रवास करताना सुटे पैसे तिकीटच्या मागे लिहून घेण्याची प्रथा आहे. अनेकदा बसमधून उतरण्याच्या घाईत प्रवासी पैसे घेण्याचे विसरतात. ...
बसमध्ये प्रवास करताना सुटे पैसे तिकीटच्या मागे लिहून घेण्याची प्रथा आहे. अनेकदा बसमधून उतरण्याच्या घाईत प्रवासी पैसे घेण्याचे विसरतात. त्यामुळेच अकोट-अमरावती बसफेरीतील प्रवाशाने सुटे पैसे तातडीने देण्याचा आग्रह धरला, नव्हे तो हट्टच होता. वाहक स्त्री असल्याने बोलण्याला वाव असल्याचे पाहून त्याने आवाजही चढविला. आता मात्त्पारा चढविण्याचा क्रमांक महिला वाहकाचा होता. आम्ही काही घरचे भिकारी नाही. आम्ही सुद्धा पाचशे-हजार रुपये सहज सोबत आणू शकतो. पण, बस डेपोतून सुटताना फक्त शंभर रुपये सुटे देण्यात येतात. तुमच्या चिल्लरसाठी घरून पैसे आणून चोरी लावता काय? चेकिंगच्या वेळी अतिरिक्त पैसे कुठून आणले, तिकीट न देता प्रवाशांकडून तर घेतले नाही ना, अशा प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर तुमचे ‘अबक’ देणार काय, या प्रश्नाचे उत्तर त्या प्रवाशाकडे नव्हते. त्याचे गंतव्य स्थळ येताच तोही चिल्लर परत न घेता मुकाट एसटीतून उतरला.
- संदीप मानकर, अमरावती