माकडाचा उपद्रव, महिलेच्या एका पायाला २० टाके, दुसरा फ्रॅक्चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:12+5:30
छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माकड प्रजातीतील लंगूरने बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्थानिक काँग्रेसनगरात उपद्रव घातल्यामुळे एक महिलेला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले. महिलेच्या एका पायाला २० टाके पडले असून, दुसरा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
छाया चंद्रशेखर देशमुख (६२) असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका, वनविभागाच्या चमूला चवताळलेल्या लंगुरास बेशुद्ध करण्यात यश आले. मात्र, लंगुराच्या उपद्रवामुळे काही काळ काँग्रेसनगरवासी भयभीत झाले होते. येथे बुधवारी सकाळी ८ पासून आठ-दहा लंगूर धुमाकूळ घालत होते. घराच्या छतावर, आवारात काही तरी खाण्यास शोधत असताना, यातील एक लंगूर चवताळले. पहाटे भ्रमंतीला जाणाऱ्या छाया देशमुख यांच्यावर त्याने हल्ला केला. चावा घेत रक्तबंबाळ केले. यानंतर लंगूरने जोरात उडी घेतल्याने त्यांचा पाय फ्रॅ क्चर झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तब्बल १०० ते १२५ किलो वजनाचे हे लंगूर असल्याची माहिती वनविभागाने दिली. ट्रँक्विलायझरने बेशुद्ध केल्यानंतर लंगूरला जंगलात सोडण्यात आले. महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, वनरक्षक अमोल गावनेर यांनी या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.
रेस्क्यू चमूने मिळविले नियंत्रण
काँग्रेसनगरात लंगुरांनी उपद्रव सुरू केला. सेवानिवृत्त शिक्षिकेला गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती मिळताच वनविभागाचे रेस्क्यू पथक आणि महापालिका पशू विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. उपद्रव घालणाºया लंगूर माकडाला जेरबंद करुन इतरांना हाकलून लावले. नगरसेवक बबलू शेखावत यांनी रेस्क्यू चमूला पाचारण केले.
अन्न, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज
लंगूर माकड हे सहसा जेथे अन्न, पाणी मिळेल अशाच देऊळ, मंदिर भागात संचार करतात. मात्र, उन्हाळ्यात घराच्या छतावर पापड, अन्नधान्य वाळू घालणे याकडे सुद्धा लंगूर आकृष्ट झाले असावे. हल्ली शहरी भागात निंबाच्या झाडाला निंबोळ्या लागल्या असून, त्या खाण्यासाठी ते आलेत, अशी माहिती उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.