काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:36 AM2018-06-08T01:36:12+5:302018-06-08T01:36:12+5:30

धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व जिल्हा परिषद अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने गुरुवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.

Movement with black ribbons | काळ्या फिती लावून आंदोलन

काळ्या फिती लावून आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देनिषेध : धुळे झेडपीतील मारहाण प्रकरण

अमरावती : धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व जिल्हा परिषद अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने गुरुवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणाकृती पुतळ्याची ६ जून रोजी अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली. धुळे झेडपी कर्मचारी व जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते हे पुष्पहार अर्पण करून पुतळ्याचे पावित्र्य कायम राखत असतानाच गुंडप्रवृत्तीच्या एका अज्ञात माणसाने शिवाजी दहिते यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी अमरावती येथे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध करीत संबंधितांना अटक व कारवाईची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, संजय राठी, विजय कविटकर, समीर चौधरी, ईश्वर राठोड, समीर लेंधे, प्रशांत धर्माळे, अमोल कावरे, अशोक थोरात, नीलेश तालन, सुशील बडोणे, ज्योती गावंडे, सुशीला तानोडकर, अनूप टाले, किशोर राठोड, लीलाधर नाल्हे, दीपक इंगळे, श्रावण अंभोरे, गजानन कोरडे, मिलिंद खंडागळे, प्रीतम चव्हाण, मधुकर पवार, विजय उपरीकर, ऋषीकेश कोकाटे आदींचा सहभाग होता.
 

Web Title: Movement with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.