निकाल जाहीर होऊनही नियुक्ती मिळेना, वय निघून जात असल्याने उमेदवारांची खंत
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळत नसल्याची खंत बहुतांश उमेदवारांची आहे. गत तीन वर्षापासून परीक्षांच्या तारख्या ठरत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडत आहे.
गतवर्षी मार्चपासून कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अशातच केंद्र व राज्य सरकारच्या अधिनस्थ विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. साधारणत: पदवी, पदव्युत्तरनंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, राज्यात कोरोनाच्या संकटाने गत दोन वर्षापासून एमपीएससी परीक्षांच्या तारखा निश्चित होत नसल्याने प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या स्वप्नावर विरजण आले आहे. काही जण एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना वय काठावर आल्याने चिंतातूर झाले आहे. दररोज पाच ते सहा परीक्षांची तयारी करूनही एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर होत नसल्याने उमेदवारांसह त्यांचे पालकही हैराण झाले आहेत.
------------------
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर होणार कधी?
- राज्यात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती एमपीएससीमार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यात एकूण १५,५१५ पदे भरण्यासाठी मान्यता देत असल्याचे मंगळवारी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
- एमपीएससीमार्फत विविध पदे भरण्याची घोषणा केली असली तरी परीक्षांच्या तारखा विलंबाने जाहीर होत असल्याने काही विद्यार्थ्यांचे वय काठावर असल्यांना वेळेत अर्ज सादर करता येणार नाही. स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत वयाची रेंज गायब होत चालली आहे.
-------------------
क्लासलाही विविध अडणची
सन २०१८ पासून एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. आज, उद्या, कधीतरी एमपीएससीच्या तारीख जाहीर होतील, याची प्रतीक्षा करताना थकून गेले आहे. राज्य शासनाने अधिवेशनात पोलीस, महसूल अन्य विभागाच्या पदभरतीसाठी एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. प्री-परीक्षाच्या तारीख घोषित कराव्या. दरवर्षी जिल्ह्यातून १५ ते २० हजार उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात.
- प्रदीप वानखडे, क्लास चालक
--------------
स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन क्लासला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. १०० पैकी १० टक्केच ऑनलाईन उपस्थिती असते. काही खासगी स्पर्धा परीक्षा केंद्रांकडे ऑनलाईनच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उमेदवारांची ऑनलाईन क्लासला नकारघंटा आहे. कोरोनामुळे अद्यापही भीती असून, ही बाबसुद्धा क्लासमध्ये न येण्यास कारणीभूत ठरत आहे.
- मनीष वाळवे, क्लासचालक
------------
ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?
१) कोविड- १९ नियमावली लागू आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्लासेसही बंद आहे. परिणामी ऑनलाईन क्लास सुरू आहे.
२) एमपीएससी परीक्षांसाठी एससी, एसटी संवर्गासाठी ४३ तर, खुले प्रवर्गातील उमेदवारासाठी ३७ वर्षे आहे. मात्र, तीन वर्षापासून परीक्षांच्या तारखा जाहीर न झाल्याने अनेकांनी वयाच्या सीमा ओलांडल्या आहेत.
३) ऑनलाईन क्लासचा फारसा लाभ होत नाही. ऑफलाईन क्लासचा लाभ होतो. काही बाबी कायम स्मरणात असतात. त्या स्पर्धा परीक्षांच्यावेळी कामी पडतात.
--------
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!
कोट
एमपीएससीच्या यापूर्वी दोनदा परीक्षा दिली. अगदी चार ते पाच गुणांनी उत्तीर्ण हुकले. पुन्हा जोमाने तयारी करीत असताना आता २०१८ पासून एमपीएससी परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. प्रशासकीय सेवेत करिअर घडविण्यासाठी अवघे तीन वर्षे हाती आहे.
- राजू काळे, विद्यार्थी
------------
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात १० जुलै २०१९ रोजी जलसंपदा विभागात ५०० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले. मात्र, दोन वर्षे झाले असताना ना परीक्षा, ना तारीख, ना सूचना असा शासनाचा कारभार आहे. काही विद्यार्थी वयाने कालबाह्य होत असताना शासनाने विचार करावा.
- अजित टिक, विद्यार्थी