पान १
फोटो पी १० पाऊस
अमरावती : पावसाची वाट पाहणाऱ्या अमरावतीकरांना गुरुवारी मान्सूनने सुवार्ता दिली. दुपारी १२ नंतर सुमारे २ ते ३ तास दमदार पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे, दर्यापूर तालुक्यातील नदी-नाले पावसाने प्रवाही झाले. अमरावती शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. नौकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती, भातकुली, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूररेल्वे या तालु्क्यात गुरुवारी मुसळधार पावसाने खरीप हंगामाची धामधूम वाढविली.
धामणगाव : गुरुवारी संपूर्ण तालुक्यात दुपारपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने नाले वाहू लागले आहेत. विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुरू केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने ते पेरणीविनाच परतले. धामणगावात दमदार पाऊस आल्याने बळीराजा सुखावला. पहिल्यांदाच काही भागातील नाल्यांना पूर आला. आगामी तीन दिवस पावसाचे असल्याने तसेच जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी दिली.
तिवसा : शहरात गुरुवारी दुपारी १२.२० वाजता वादळी पाऊस कोसळला. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदला आहे. सुमारे दोन तास पाऊस कोसळला.
चांदूूररेल्वे : गुरुवारी अचानक बरसलेल्या पावसामुळे शहरातील नाले तुडुंब भरले होते. काही भागात नाल्यातील पाणी अनेक ठिकाणी अडल्याने ते पाणी सखल भागात शिरले. काही नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षांनी स्वतः नाल्यांमध्ये जेसीबीच्या साह्याने तुडुंब भरलेले नाले मोकळे केले.
वरूड : तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दर्यापूर तालुक्यात देखील दुपारनंतर अर्धा तास मान्सूनच्या सरी कोसळल्या.
भातकुली : तालुक्यातील रामा, टाकरखेडा संभू, अळणगाव, गोपगव्हाण, निंभा, खारतळेगाव, वाठोडा भागात मृगधारा कोसळल्या. उर्विरत गावात ढगाळ वातावरण आहे.
बॉक्स
अमरावती शहरात धुवांधार
शहरात दुपारी १२ ते २ या कालावधीत संततधार कोसळली. त्यामुळे अंबा नाला प्रवाही झाला. तर, चौधरी चौकातील रामलक्ष्मण संकुल, जयस्तंभ, मालविय चौकातील उड्डाणपुलालगतच्या भागातील सखल भागात पाणी साचले. त्यातून वाहनधारकांना वाहने काढावी लागली.