अमरावती : उच्च शिक्षण विभाग तंत्रशिक्षण विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या अखत्यारितील राज्यात अस्तित्वातील कोणत्याही विशिष्ट नावे संबोधण्यात न येणाऱ्या शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांना यापुढे मातोश्री शासकीय वसतिगृह असे नाव दिले जाणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्याच्या विभागात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मुला-मुलींची शासकीय वसतिगृह आहेत. मात्र, या वसतिगृहांना कोणत्याही नावाने संबोधले जात नव्हते. मात्र, त्यांचा उल्लेख केवळ शासकीय वसतिगृह असाच व्हायचा या वसतिगृहांना मातोश्री शासकीय वसतिगृह, असे नाव देण्याची मागणी होत होती. ही बाब लक्षात घेता शासनाने शासकीय वसतिगृहांना मातोश्री वसतिगृह, असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय वसतिगृहे ही केवळ भिंतीचा निवारा न राहता वसतिगृहे ही मुला-मुलींसाठी आधार आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणाऱ्या आधारगृहे असावीत. मुला मुलींचे शिक्षण सहज व आनंददायी व्हावे पालकांच्या मनात मुला-मुलींना शासकीय वसतिगृह ठेवण्याविषयी विश्वास निर्माण व्हावा. आपल्या घरापासून दूर शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना वसतिगृहे हे स्नेह व जिव्हाळ्याची देणारे ठिकाणी आहे. हा भाव त्यांच्या मनात जावा. या उद्देशाने शासकीय वसतिग्रह मातोश्री वसतिगृह असे संबोधने संयुक्तिक राहील. त्या दृष्टीने हा निर्णय शासनाने घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.