‘स्थायी’त नवे ११ शिलेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:58 PM2019-02-20T21:58:48+5:302019-02-20T21:59:15+5:30
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती सुचविण्यावरच बुधवारच्या आमसभेत काथ्याकूट करण्यात आले. सभापतींनी स्थायीच्या नव्या शिलेदारांची नावे जाहीर केल्यानंतर आमसभा स्थगीत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती सुचविण्यावरच बुधवारच्या आमसभेत काथ्याकूट करण्यात आले. सभापतींनी स्थायीच्या नव्या शिलेदारांची नावे जाहीर केल्यानंतर आमसभा स्थगीत करण्यात आली.
महापालिकेच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बुधवारच्या आमसभेच्या सुरूवातीलाच सभा स्थगित ठेवण्याचा मूड सत्ताधारी बाकावर होता. सुरूवातील ज्येष्ठ सदस्य मिलिंद चिमोटे यांनी कश्मिर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर मागील सभेतील कार्यवृत्तांत कायम करण्याच्या विषयावर सभागृहात खडाजंगी झाली. मल्टियुटिलिटी वाहन खरेदी व्यवहारात झालेल्या अनियमिततेसंदर्भातील अहवाल सभेत आयुक्त सादर करतील, असे रूलींग मागच्या आमसभेत सभापतींनी दिले होते. त्यानुसार या सभेत हा अहवाल का सादर झाला नाही याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला पत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली. याच मुद्यावरून सलीम बेग युसूफ बेग, अजय गोंडाणे, रासने, धीरज हिवसे यांनी आयुक्तांना विचारणा करून वातावरण तापविण्याच्या प्रयत्न केला. मात्र प्रोसिडींग कायम करताना यामध्ये दुरूस्ती करता येते. मात्र, यावर चर्चा नसावी, असे ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी सुचविले, मिलिंद चिमोटे यांनी हाच सुर आवळला. दोन कोटींचे बिल ३ दिवसांत देता येते, तर यामधील अनियमितता शोधण्याला चार महिने का, असा सवाल अजय गोंडाने यांनी केला. यावर आयुक्तांनी हा अहवाल सादर करण्यास अवधी मागितला. यात १३ विषयांवर स्कोप आॅफ वर्क आहे. यापूर्वी पोद्दार चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर नाही. त्यामुळे १६ कंपोनंटवर चौकशी सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली.
चौकशी अहवाल दोषींच्या नावासहीत हवा
मल्टियुटिलिटी वाहन खरेदी घोटाळ्याचा अहवाल सादर करताना यामध्ये दोषी असणाºयांच्या नावासहीत हवा. यामध्ये दोषी कोण आहेत, याची माहिती आम्हाला आहे. बिल कसे निघाले हेदेखील आम्हाला माहीत आहे. त्यामुळे अहवालात दोषींची नावे यायलाच पाहिजे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात जाऊन आम्हाला आवाज उठवावा लागेल, असे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत म्हणाले. काश्मीर खोºयात शहीद झालेल्या जवानांच्या परिवारास विलास इंगोले व बबलू शेखावत यांनी एक महिन्याचे मानधन देत असल्याचे जाहीर केले.
‘स्थायी’ समितीमधील नवे सदस्य
गटनेत्यांनी दिलेल्या नावानुसार स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या नावाची घोषणा सभापतींनी केली. यामध्ये भाजपाचे सहा, बीएसपीचे १ व शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. भाजपाचे विजय वानखडे, राजेश साहू, धीरज हिवसे, राधा कुरील, नीता राऊत, प्रकाश बनसोड, शिवसेनेचे भारत चौधरी, बसपाच्या सुगरा रायलीवाले यांचा समावेश आहे. सभापती विवेक कलोती व एमआयएमच्या रूबीना तबस्सुम हारून अली व अब्दूल नजीम अब्दूल रजाक यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी भाजपाचे चेतन गावंडे व एमआयएमचे मो. शाबीर मो. नसीर तसेच राजीया खातून निकरामोद्दीन यांची निवड झाली