अमरावती : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत शहरी भागात नवीन व स्वस्त धान्य दुकान परवाना मंजुरीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचा आदेश १६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आला आहे. या नवीन आदेशाने जिल्ह्यात नवीन रेशन दुकाने वाढणार असून, नवीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने मंजूर करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे. नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांचा परवाना मंजूर करण्यास शासनाच्या १३ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती १६ सप्टेंबर २०२१ रोजीचे शासन आदेशानुसार उठविण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. त्यामध्ये शहर व ग्रामीण भाग मिळून १८ धान्य दुकानांची संख्या वाढणार आहे.
बॉक्स
काय आहेत अडचणी
रेशन धान्य दुकान मंजूर नसलेल्या संबंधित भागातील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना स्वतः जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
रेशनसाठी लाभार्थ्यांना घरापासून बरेच दूर असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाण्याचा त्रास सहन करावा लागतो.
नवीन रेशन धान्य दुकान मंजूर झाल्यास रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची धान्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे, तसेच अडचणी कमी होणार आहेत.
कोट
शासनाच्या आदेशानुसार शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नवीन १८ स्वस्त धान्य दुकाने परवाने मंजूर करण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
डी.के. वानखेडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती
बॉक्स
कोठे किती वाढणार?
कॅम्प- १
राजापेठ- ४
नागपुरी गेट- १
नवी वस्ती बडनेरा- २
मसानगंज- १
अंबागेट- २
केडिया नगर- १
सातुर्णा- १
कृष्णानगर- १
चिचफैल- १
जेवडनगर- १
ओंकारखेडा नांदगाव खंडे- १
धामनगाव रेल्वे- १
बाॅक्स
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाची संख्या- १९१४
शहरी- १६२
ग्रामीण- १७५२