बातमी/सारांक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:33+5:302021-01-14T04:11:33+5:30

अमरावती : येथील अकोली रेल्वे स्थानकाचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहने चालविणे कठीण ...

News / Summary | बातमी/सारांक्ष

बातमी/सारांक्ष

googlenewsNext

अमरावती : येथील अकोली रेल्वे स्थानकाचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहने चालविणे कठीण झाले आहे. रेल्वे स्थानक ते साईनगर यादरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे.

-------------------------

बांबू गार्डनमध्ये गर्दी वाढली

अमरावती : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद असलेले उद्यान, गार्डन आता सुरू झाले आहे. त्यामुळे बांबू गार्डनमध्ये चिक्कार गर्दी वाढली आहे. शाळा बंद असल्याने कुटुंबीय बच्चे कंपनीसह मौजमजा, आनंद लुटण्यासाठी बांबू गार्डनमध्ये येत आहेत. गत आठवड्यापासून गर्दी वाढली आहे.

---------------

महानगरात नवीन कॉलनींमध्ये विकासकामे केव्हा?

अमरावती : शहरात नवीन वसाहती, कॉलनी निर्माण होत असून, बांधकाम शुल्क अदा केल्यानंतरही या भागात रस्ते, नाल्यांचे बांधकाम वर्षानुवर्षे होत नाही. घर बांधल्यानंतरही नागरिक येथे राहण्यासाठी जाण्याचे टाळतात. त्यामुळे नवीन कॉलनी, वसाहतींमध्ये विकासकामे केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

------------------------

पाचबंगला परिसरात रस्ते उखडले

अमरावती : बडनेरा पाच बंगला परिसरात मुख्य रस्ता उखडला आहे. या मार्गावरून जड वाहनांची दरदिवशी गर्दी असल्यामुळे नागरी वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. लहान मुले रस्त्यालगत खेळताना अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

-----------------------

नवीन वळण मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक

अमरावती : नागपूर नवीन वळण महामार्गावर वाहन चालक शॉर्टकट मार्ग काढण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवित असल्याचे चित्र आहे. वडाळी ते यशोदानगर यादरम्यान महामार्गावर ही बाब नित्याचीच झाली असून, प्रसंगी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.