इंदल चव्हाण -अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत १६७० रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०१ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले, तर डेंग्यू संशयित ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाची उपाययोजना करताना तारांबळ उडाली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे सर्वच भागात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांत वाढ झालेली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेविकांद्वारा ग्रामीण भागात व शहरी आरोग्य केंद्रनिहाय, वाॅर्डनिहाय, घरोघरी पाहणी केली जात आहे. डास उत्पत्तीचे स्थान टेमिफॉसने नष्ट करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षकांद्वारा पर्यवेक्षणाचे कार्य सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
बॉक्स
डेंग्यू दूषित गावांत धूर फवारणी
ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले तेथे आठवड्यातून दोन वेळा धूर फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यात गप्पीमासे सोडण्यात येत आहे. यातून बऱ्यापैकी आजार कमी होण्यास मदत झाल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याची माहिती डिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.
कोट
सध्या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू आहे. यावर आरोग्य प्रशासन काम करीत आहे. नागरिकांनीही घराशेजारी साचलेले पाण्याचे डबके कोरडे करावे. टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावावी. झोपताना मच्छरदाणी, धूप अगरबत्ती, लिक्विडचा वापर करावा. शासनाकडून उपाययोजना सुरू आहेच.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
बॉक्स
तालुकानिहाय रक्तजल नमुने, डेंग्यू रुग्ण व डेंग्यू संशयितांचा मृत्यू
धारणी ११ २ १
चिखलदरा १९ ७ -
अचलपूर २४३ २९ १
अंजनगाव १३ ००
चांदूर बाजार ७६ १६
दर्यापूर १९ २
भातकुली ३२ १
वरूड १२ ४
अमरावती ८२ १०
नांदगाव खं. २५ ५
चांदूर रेल्वे २३ ५ १
धामणगाव रे. १२ ३
तिवसा ३८९ ३२ ५
मोर्शी ६६ १६ १
महानगर ५९९ ६३
कार्यक्षेत्राबाहेरील ४९ ६
कोट
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी