अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर एकूण १२ हजार ५९३ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत छाननी करण्यात आली. यामध्ये १४ तालुक्यांतून १३२ अर्ज बाद झाले, तर १२ हजार ४६१ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
गत एप्रिल ते डिसेंबर या महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली. १२ हजार ५९३ अर्जांमधून १२ हजार ४६१ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.
बॉक्स
४ जानेवारीला उमेदवार यादी होणार प्रसिद्ध
जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ४ नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय बाद अर्ज
तालुका दाखल अर्ज बाद अर्ज
अमरावती १०७४ ११
भातकुली ७७२ ०४
तिवसा ६६८ ०१
दर्यापूर १२४४ १३
मोशी ९०० २०
वरूड ९९७ ०२
अंजनगाव ९०२ १३
अचलपूर ९७२ १५
धारणी ८५९ १५
चिखलदरा ५२५ १८
नांदगाव खं ९९९ ०७
चांदूर रेल्वे ५७८ ०३
चांदूर बाजार ९१५ ०१
धामणगाव ११७८ ०९