खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

By admin | Published: June 14, 2016 12:04 AM2016-06-14T00:04:58+5:302016-06-14T00:04:58+5:30

यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून.

Non-bailable Offenses if frauds are done in seeds, seeds | खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

Next

पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
अमरावती : यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशे उपलब्ध करून द्यावे तसेच खते व बियाणात शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे. विक्रेत्यांनी बोगस बियाणे, खते कीटकनाशक विकून शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. याला आळा घालण्यासाठी बोगस बियाणे, खते विके्रत्यांवर व कंपन्यावर थेट फौजदारीसह अजामिनपात्र गुन्हा नोंदविण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक ते बोलत होते. निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करून जोमाने उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु काही बोगस खते, औषधे आणि बियाण्यांच्या कंपन्या, पुरवठादार, दुकानदार, दलालांची साखळी यात शेतकऱ्यांची फसवणूक करतात. या पार्श्वभूमिवर उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांनाच लगाम लावण्याचे ना.पोटे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करून दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बियाणे, खतांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्र्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. दुकानदार, कंपन्यांवर चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

बियाणे, खते खरेदीच्या पावत्या सांभाळून ठेवा
यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीच्या पक्क्या पावत्या, बियाणांच्या थैल्या सांभाळून ठेवाव्यात व काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांकडे असलेले पुरावे कृषी अधिकाऱ्यांनी जमा करावेत. सर्व कागदपत्रांसह संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करता येईल, असे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले

Web Title: Non-bailable Offenses if frauds are done in seeds, seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.