नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत स्वच्छतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:00+5:302021-09-22T04:15:00+5:30
फोटो - नांदगाव खंडेश्वर २१ पी नांदगाव खंडेश्वर : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समितीमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, तसेच ...
फोटो - नांदगाव खंडेश्वर २१ पी
नांदगाव खंडेश्वर : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समितीमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, तसेच कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी सतीश खानंदे यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वच्छ भारत मिशन व ग्रामीण योजनेशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यातकरिता मार्गदर्शन केले. यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत ‘हगणदरीमुक्त अधिक’ या संकल्पनेला ग्रामपंचायतने यशस्वी राबवावे व सार्वजनिक उत्सवामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करावा, प्लास्टिकचा कचरा कमीत कमी होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने एक तरी शोषखड्डा सांडपाण्यासाठी करावा, असे सूचित केले.
स्वच्छतेची शपथ विस्तार अधिकारी आरोग्य प्रदीप होले यांनी दिली. यावेळी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव, संदीप देशमुख, गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे, सुनील गोळे, प्रीतम चर्जन, विजय कावळे, बालविकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट, नितेश अंभोरे, मंगेश मानकर, प्रदीप होले, लक्ष्मण खंडारे, श्रीकांत मेश्राम, राहुल चौधरी, दीपक बांबटकर, रत्नाकर मुळे, विजय अळणे, कमल धुर्वे, ज्योती अडसूळ, विजय मालोकार, परवेज खान, शंकर कवाडे, संदीप कोवे, मनीष देशमुख, महेंद्र झीमटे, अजय ठाकरे, सुषमा सूने, संपदा वाघमारे, हिमांशु कुसळे, सचिन ठाकरे, दीपाली कापडे, रवि जावरकर, मीना मेश्रे, गजानन देऊळकर, महिंद्रा गांडोळे, मनीष मदनकर, नितेश लांडे, विक्की रत्नपारखी, व्यंकटेश दुरतकर, खुशाल कापसे, अक्षता जळीत, संतोष सानप, रीतेश कोठेकर, संदीप डोफे, पुरुषोत्तम डोफे, सुवर्णा देशमुख, अशोक टाके, छत्रपती दवडे, गजानन लोखंडे, अंकुश गाढवे, पूनम विटीवाले, सूर्यकांत बनकर यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
210921\img-20210921-wa0005.jpg
पंचायत समितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ.