प्राथमिक शिक्षकांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:51+5:302021-07-21T04:10:51+5:30
अमरावती : सन २०२० व २०२१ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या होणाऱ्या वार्षिक बदल्या न झाल्यामुळे गैरसोय येत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना ...
अमरावती : सन २०२० व २०२१ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या होणाऱ्या वार्षिक बदल्या न झाल्यामुळे गैरसोय येत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता कोरोनाची लाट ओसरत आल्यामुळे बदल्यांचे वेध लागलेले आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने पारित केलेल्या सुधारित निर्णयाची दुर्गम शाळांच्या निकषानुसार अति पर्जन्यमान, वाहतुकीच्या सोयीचा अभाव, संवादच छायेचा प्रदेश, जंगली श्वानांचा हल्ला आदी समावेश करण्यात आला आहे. सुगम शाळेत सलग १० वर्ष एकाच शाळेत व सलग पाच वर्षे सेवा झालेले, शिक्षकच प्रशासकीय बदलीसाठी पात्र धरण्यात आलेले आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना एकाचवेळी सर्व संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांना करता संवर्ग निहाय टप्प्याने बदल्या होणार आहेत. एका टप्प्यातील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यासाठी शाळांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी असणाऱ्या शाळांच्या २० पसंतीक्रमऐवजी शिक्षकांना ३० शाळा पर्याय भरता येणार आहेत. स्वतःहून दुर्गम शाळा मागणाऱ्याला शिक्षकांची तीन वर्षांनी प्राधान्याने सुगम भागात बदली होणार आहे. सुगम भागात बदली मागणाऱ्या शिक्षकाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विनंती बदली मागता येणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होणार आहे. संवर्ग एक मध्ये समावेश होणाऱ्या व्याधीग्रस्त शिक्षक व त्यांचे जोडीदार घटस्फोटीत महिला, विधवा, कुमारिका, आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक यांना संवर्ग एकमधून लाभ घेतल्यानंतर तीन वर्ष बदलीसाठी प्रतिबंधित केले आहे. संवर्ग १ मध्ये समावेश असणाऱ्या कर्मचारी पती-पत्नीमध्ये दोघांपैकी कोणालाही बदली मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संवर्ग ३ मध्ये समावेश असणाऱ्या दुर्गम शाळेतील शिक्षकांना सलग तीन वर्षे सेवा केल्यानंतर प्राधान्याने बदलीचा अधिकार देण्यात आलेला आहे. संवर्ग-४ मधील व कार्यरत असणाऱ्या शिक्षक पती-पत्नीला एक युनिट माणून बदली करण्यात येणार आहे. बदलीबाबत शासनाने धोरण ठरविले असले तरी अद्याप प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत शासन स्तरावरून सूचना आलेल्या नाहीत. अशातच शिक्षक संवर्ग वगळता अन्य झेडपी कर्मचाऱ्यांच्या पुढील आठवड्यात बदल्यांचा बिगूल वाजणार असल्याने आता शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत.