आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:09+5:302021-04-09T04:14:09+5:30

---------------------------------------- मास्क न बांधता गर्दीत आढळल्याप्रकरणी गुन्हा अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तोंडाला मास्क न लावता गर्दीच्या ...

Offense in continuing the establishment | आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा

आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा

googlenewsNext

----------------------------------------

मास्क न बांधता गर्दीत आढळल्याप्रकरणी गुन्हा

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तोंडाला मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी आढळून आल्याप्रकरणी भातकुली पोलिसांनी एका युवकावर भादंविचे कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. ही कारवाई ४ एप्रिल रोजी करण्यात आली.

--------------------------------------------------------

चारचाकी वाहनाची कारला धडक

अमरावती : चारचाकी वाहनाची कारला धडक लागन्याने नुकसान झाले. ही घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील राजपूत ढाब्यावजळ रिंगरोड येथे बुधवारी घडली. कमलेश रामकिशोर जयस्वाल (५५, रा. परतवाडा)यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी एमएच २० बीएन ४६२५ च्या चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ४२७ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------------------------

निंभा येथे दारू जप्त

अमरावती : बडनेरा पोलिसांनी निंभा येथे कारवाई करून ७५० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी हनुमंत लक्ष्मण बाहे (४०, रा. निंभा ता. भातकुली) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------फ़

महिलेच्या पायावरून ऑटो गेल्याने दुखापत

अमरावती : भरधाव ऑटोने दुचाकीला धडक दिल्याने महिला खाली पडली. त्यानंतर ऑटो तिच्या पायावर गेल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील संजय गांधीनगरात बुधवारी सकाळी घडली.

ऑटो क्रमांक एमएच २७-बीडब्ल्यू ३०७० च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणी जखमी महिलेच्या पती फिर्यादी वसंत वासुदेवराव साठे (५६, रा. दस्तुरनगर) यांनी तक्रार नोंदविली.

Web Title: Offense in continuing the establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.